Prajakt Tanpure : राहुरी : राहुरीचे माजी आमदार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी आज मुबंईत भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party) प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात हा सोहळा दुपारी तीन वाजता झाला. विधान परिषद स्थानिक स्वराज्य अहिल्यानगर मतदार संघातून महायुती तर्फे भाजपचा उमेदवारी अर्ज ते एक जूनला दाखल करणार आहेत. राजकारणात पक्षनिष्ठा ही महत्त्वाची आहेच परंतू बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेण्याला देखील विशेष महत्त्व आहे.
नक्की वाचा : रयतच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवडीबद्दल रोहित पवार यांचा कर्जतमध्ये सत्कार
यापूर्वीही विखे यांनी दिली होती पक्षप्रवेशाची ऑफर
जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदार विखे, राजळे,कोल्हे,पिचड,पाचपुते आदींनी केव्हाच भाजपची वाट धरली. प्राजक्त तनपुरे आज या वाटेवर येत आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात अक्षय कर्डिले यांचा सहज विजय व्हावा म्हणून पडद्याआड ज्या घडामोडी घडल्या त्या आता दृष्टीपथात येत आहेत. अशी काही चर्चा झाल्याचे त्यावेळी पक्ष किंवा तनपुरे यापैकी कोणीही सांगितलेले नव्हते. मात्र माध्यमात याची जोरदार चर्चा चालू होती. तीच आता खरी होताना दिसते आहे. प्राजक्त तनपुरे यांना 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑफर दिलेली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जयंत पाटील यांच्या परवानगी शिवाय झाला हा पक्षप्रवेश (Prajakt Tanpure)
आपण भारतीय जनता पक्षात या. आपले सर्व प्रश्न सोडवले जातील असा निरोप वाड्यावर दिला होता. मात्र या प्रस्तावावर ते वेळीच निर्णय घेऊ शकले नाहीत. बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे जिल्हा सहकारी बँकेवर या सहमती राजकारणातूनच दोनदा बिनविरोध निवडले गेले. तसेच त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांचे मामा माजी मंत्री जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे एकत्रितपणे राजकीय निर्णय घेतील अशी वंदता होती मात्र बदललेल्या परिस्थितीत मामांनीच याबाबतचे सूत्र हलवली आहेत.मात्र आज त्यांनी काहीही सुत्रे हलवली नाहीत. त्यांना न सांगता त्यांच्या परवानगी शिवाय हा प्रवेश होत असल्याचे तनपुरे यांनी माध्यमांना सांगितले.
राहुल कुल यांचा देखील या पक्षप्रवेशा साठी पुढाकार
त्याचबरोबर त्यांचे साडू आमदार राहुल कुल यांनी देखील या पक्षप्रवेश साठी पुढाकार घेतला आहे. त्यावेळीही भारतीय जनता पक्ष तसेच विधान सभा निवडणुकीपूर्वीही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही स्वतः प्राजक्त तनपुरे यांचेशी फोनवर संपर्क साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या गटातून त्यांनी राहुरी विधानसभेची निवडणूक लढवावी याबाबत प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. मात्र या दोन्हीही प्रस्तावावर तनपुरे निर्णय घेऊ शकले नाहीत.कदाचित शरदचंद्र पवार यांची साथ सोडण्यासाठी त्यांचे मन धजावत नव्हते. आमदारकीचे तिकिट आणि मंत्रीपद देणारे नेतृत्वावर त्यांनी एकनिष्ठ राहणे पसंत केले.
सत्ताधारी पक्षाबरोबर असण्याचे अनेक फायदे
भाजप व जिल्ह्यातील विखे नेतृत्वाशी जूळवन न घेण्याची अर्थात पंगा घेण्याची किंमत प्राजक्त तनपुरे यांना मोजावी लागली. तशीच किंमत पाच वेळेस आमदार असलेल्या प्रसाद तनपुरे यांनाही मोजावी लागली. सत्ताधारी पक्षाबरोबर असण्याचे अनेक फायदे असतात. ईडी सारख्या च्या कचाट्यात नेते सापडत नाहीत.शिवाय विकास कामे होण्यासाठी ते गरजेचे असतेच.या भूमिकेतूनच अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले आणि त्यांच्या सर्व आमदारांनी महायुतीशी जुळवून घेतले. त्यावेळी राहिलेली ही गोष्ट आता तालुक्यात पूर्ण होत आहे .म्हणून जयंत मामा प्रतीची कृतज्ञता म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी डीपीवर जयंत मामांना राम राम करताना चा फोटो ठेवला आहे.
दिलेला शब्द देवाभाऊंनी आता पूर्ण केला
अशी माध्यमात ज़ोरात चर्चा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ऐन वेळेस एनसीपी पक्षाचा एबी फॉर्म येवूनही निवडणुकीत न उतरण्याची भूमिका प्राजक्त तनपुरे यांनी घेतली होती. मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी थेट फोनवर प्राजक्त तनपुरे यांचेशी संपर्क झाला होता .त्यावेळी पक्षाला सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली होती. ती मान्य केल्यामुळे त्यावेळी दिलेला शब्द देवाभाऊंनी आता पूर्ण केला आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या साठी इच्छुक होते. मात्र तनपुरे यांना दिलेला शब्द भाजपने पाळला आहे. शब्द पाळण्याचा रिटर्न गिफ्ट भाजप तनपुरे यांना देत आहे.
अशी वेळ राहुरीच्या राजकारणात प्रथमच
आता राहुरीला दोन आमदार तेही सत्ताधारी गटाचे अर्थातच भारतीय जनता पक्षाचे मिळणार आहेत. अशी वेळ राहुरीच्या राजकारणात प्रथमच आलेली आहे. प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा डॉ. दादासाहेब तनपुरे दोनदा आमदार होते तर वडील प्रसाद तनपुरे पाच वेळेस आमदार व एक वेळेस खासदार होते. विधानसभा पुर्नरचनेत राहुरी मतदारसंघ कोपरगाव ,शिर्डी लोकसभा मतदारसंघात जोडला जाणार आहे. तेथून उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तनपुरे यांनी भाजप त प्रवेश करावा यासाठी विखे पाटील मंत्री व उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील विशेष प्रयत्नशील होते.चार पाच महिन्यातील सस्पेन्स आता संपला आहे.



