Rohit Pawar : रयतच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवडीबद्दल रोहित पवार यांचा कर्जतमध्ये सत्कार

रयतच्या उत्तर विभाग अध्यक्ष म्हणून झालेली निवड कर्जतकरांसाठी अभिमानास्पद

0
Rohit Pawar : रयतच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवडीबद्दल रोहित पवार यांचा कर्जतमध्ये सत्कार
Rohit Pawar : रयतच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवडीबद्दल रोहित पवार यांचा कर्जतमध्ये सत्कार

Rohit Pawar : कर्जत : कर्जत-जामखेड यासह परिसरातील रयत संकुलाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी काम केले म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड झाली याचा आनंद आहे. आगामी काळात नक्कीच मिळालेल्या या संधीचे सोने करीत पालकांच्या मनातील स्वप्न मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. मनात व्हिजन ठेवत काम केल्यास शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा मानस आहे. यासाठी आपल्या शुभेच्छा आणि पाठबळाची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. ते दादा पाटील महाविद्यालय (Dada Patil College) आणि समस्त कर्जतकर आयोजित नागरी सत्कार समारंभ प्रसंगी कर्जत येथे बोलत होते.

नक्की वाचा : अनुसूचित जाती उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यासाठी मातंग समाज आक्रमक

सर्व शैक्षणिक संकुलात सुविधा वाढवण्यावर भर

नुकतेच आमदार रोहित पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबदल रयतचे शैक्षणिक संकुल यासह समस्त कर्जतकर आणि विविध सामाजिक संघटनेच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. यावेळी सत्कारास उत्तर देताना आमदार पवार पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात काय बदल करता येतील, क्रांती घडवून आणता येईल का ? यासाठी रयत शिक्षण संस्था हे माध्यम आहे. आगामी काळात सर्व शैक्षणिक संकुलात सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येईल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्वांचे सहकार्य अपेक्षित (Rohit Pawar)

तीन वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. कर्जत – जामखेड तालुक्यातील रयतच्या सर्व शाळा महाविद्यालयांकरिता अद्ययावत स्वच्छतागृहे उभारली. शिवाय शालेय विद्यार्थ्यांकरिता दहा हजार सायकल वाटप, अखिल भारतीय महिला कुस्ती स्पर्धा, बालकुमार साहित्य संमेलन, सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून देशपातळीवरील विविध उपक्रम राबविण्यात आले. रयत व इतर शाळेच्या विविध उपक्रमासाठी जवळपास ६०-६५ कोटी रुपये आजपर्यंत निधी देत त्यांचे रुपडे बदलले असून आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या विविध प्रलंबित प्रश्नावर काम करायचे आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी उपस्थितांना केले.

रयतच्या उत्तर विभाग अध्यक्ष म्हणून झालेली निवड कर्जतकरांसाठी अभिमानास्पद

प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ संजय नगरकर म्हणाले की, आमदार रोहित पवार यांची रयतच्या उत्तर विभाग अध्यक्ष म्हणून झालेली निवड कर्जतकरांसाठी अभिमानास्पद आहे. रयतचा रथ पुढे जात असताना नव्या पिढीचे प्रतिनिधित्व म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिले जाते. मिळलेल्या संधीचे रोहित पवार सोने करतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी आमदार रोहित पवार यांचा कर्जत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनांनी सन्मान केला.