MSRTC 78th Anniversary : एसटीचा ७८ वा वर्धापन दिन तारकपूर बस स्थानकात उत्साहात साजरा

MSRTC 78th Anniversary : एसटीचा ७८ वा वर्धापन दिन तारकपूर बस स्थानकात उत्साहात साजरा

0
MSRTC 78th Anniversary : एसटीचा ७८ वा वर्धापन दिन तारकपूर बस स्थानकात उत्साहात साजरा
MSRTC 78th Anniversary : एसटीचा ७८ वा वर्धापन दिन तारकपूर बस स्थानकात उत्साहात साजरा

MSRTC 78th Anniversary : नगर : लालपरी अर्थात एसटीचा ७८ वा वर्धापन दिवस (MSRTC 78th Anniversary) तारकपूर बस स्थानकामध्ये सोमवारी १ जून २०२६ रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. विभागीय यंत्र अभियंता सचिन चाचरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रमा पार पडला. या कार्यक्रमानिमित्त तारकपूर आगाराचे व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध उपक्रम राबवत वर्धापन दिन साजरा केला.

प्रवाश्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

तारकपूर बस स्थानकात ७८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त प्रवेश द्वारा समोर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. तसेच फुलांच्या माळा आणि नारळाच्या पानांनी अहिल्यानगर-सुरत ही लालपरी सजविण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागीय यंत्र अभियंता सचिन चाचरे, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज यांच्या हस्ते या गाडीची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि एसटीचे जेष्ठ प्रवासी यांच्या हस्ते लालपरीला फुले वाहण्यात आली. तसेच यंत्र अभियंता सचिन चाचरे, विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती, तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्या हस्ते प्रवासी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यावेळी यंत्र अभियंता चाचरे म्हणाले, (MSRTC 78th Anniversary)

“१९४८ पासून सुरू असलेल्या एसटीच्या कारकिर्दीची ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ७८ व्या वर्धापन दिनाच्या एसटी अधिकारी कर्मचाऱ्यांसह प्रवासी नागरिकांना शुभेच्छा. या प्रदीर्घ वाटचालीत प्रवासी नागरिकांनी एसटीवर दाखवलेला जो विश्वास आहे तो असाच अबाधित ठेवावा. एसटीच्या प्रवासासाठी असलेल्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजनेसह ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजनेचा लाभ घ्यावा. तसेच एनसीएमसी कार्ड प्रवाशांनी काढून घ्यावे, आणि नागरिकांनी एसटीनेच प्रवास करावा.” असे आवाहन यंत्र अभियंता सचिन चाचरे यांनी केले आहे.

MSRTC 78th Anniversary : एसटीचा ७८ वा वर्धापन दिन तारकपूर बस स्थानकात उत्साहात साजरा
MSRTC 78th Anniversary : एसटीचा ७८ वा वर्धापन दिन तारकपूर बस स्थानकात उत्साहात साजरा

अधिकारी-कर्मचारी तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित (MSRTC 78th Anniversary)

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज, विभागीय कर्म. वर्ग अधिकारी नितीन गटने, विभागीय वाहतूक अधीक्षक चंदू चौधरी, कामगार अधिकारी बाळासाहेब शिंगे, विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी धर्मराज पाटील, विभागीय लेखा अधिकारी लोचन गायधनी, विभागीय सुरक्षा निरीक्षक रेणुका संघई यांच्यासह तारकपूर बस स्थानकाचे स्थानक प्रमुख तथा सहाय्यक वाहतूक अधीक्षक किरण शिंदे, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश सोनवणे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गोविंद पीडियार, वाहतूक नियंत्रक किशोर केरूळकर, किशोर पराते, यंत्र शाळेतील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विद्याधर साठे, वाहतूक नियंत्रक संजय धोकटे, आदिनाथ गाडे, राजेंद्र भुते, प्रवीण धामोरे, संजय शितोळे, रवी फाटक, अहिल्यानगर- सुरत या गाडीचे चालक नितीन कांबळे, वाहक संतोष ससाने, सुषमा धोंगडे, सुवर्णा लगड, प्रवीण देवचक्के, वैभव केसभट, दीपक चंदनशिव, आशा जठार, मुजम्मिल सय्यद, चंद्रकांत धर्म, महादेव गायकवाड, अंबादास बनसोडे आदिसह राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here