Rule Change For 1st June : LPG महागला, देशभरात आजपासून ५ मोठे बदल! वाचा सविस्तर…

0
Rule Change For 1st June : LPG महागला, देशभरात आजपासून ५ मोठे बदल! वाचा सविस्तर…
Rule Change For 1st June : LPG महागला, देशभरात आजपासून ५ मोठे बदल! वाचा सविस्तर…

नगर : आजपासून नवा महिना म्हणजेच जून महिना (Rule Change From 1st June) सुरू झाला आहे. त्यामुळे देशात अनेक मोठ्या आर्थिक बदलांसह नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर आणि प्रत्येकाच्या खिशावर होताना दिसणार आहे. महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती (LPG Commercial Cylinder Price Hike) आणि इतरही अनेक गोष्टींच्या किंमतीमध्ये बदल झाला आहे.

नक्की वाचा: पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता अधिक का? कारण नेमकं काय?

देशभरात आजपासून पाच मोठे बदल झाले असून त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावरही परिणाम होणार आहे. ते बदल कोणते ?

१. LPG सिलेंडर महागला

दर महिन्याप्रमाणे, १ जून २०२६ रोजी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात सुधारणा करून नवीन दर जाहीर केले आहेत. घरगुती वापरासाठीच्या १४ किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, पण तेल कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. २०२६ मधील ही आतापर्यंतची सातवी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १५ रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत आता ३११३.५० रुपये झाली आहे, तर कोलकातामध्ये त्याच्या दरात ५२.५० रुपयांची वाढ झाली आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगरमधील ‘त्या’ गोळीबार प्रकरणाचा फिर्यादीच निघाला ‘मास्टरमाईंड’ ; प्रकरण काय?

२. कार महागली

१ जूनपासून झालेला दुसरा मोठा बदल हा कारप्रेमींसाठी मोठा फटका ठरू शकतो. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी, मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या वाहनांच्या दरातील वाढीची घोषणा केली आहे. या नवीन वाढीव किमती आज, म्हणजेच १ जूनपासून लागू होत आहेत. कंपनीने अल्टो, ब्रेझा आणि व्हिक्टोरिया यांसारख्या अनेक गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. मारुती सुझुकीच्या म्हणण्यानुसार, विविध मॉडेल्समध्ये ही दरवाढ कमाल ३० हजार रुपयांपर्यंत आहे.

३. बँकिंग नियमांमध्ये बदल

जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून बँकिंग नियमांमध्येही बदल झाला आहे. १ जून २०२६ पासून, एचडीएफसी बँकेने करंट अकाऊंट खात्यांसह आपल्या अनेक खात्यांशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून लहान नोटा आणि नाण्यांच्या कॅश डिपॉझिटर नवीन मर्यादेसह नवीन शुल्क लागू झाले आहे. आतापर्यंत, या लहान नोटांच्या रोख ठेवींवर कोणतीही मासिक मर्यादा निश्चित केली नव्हती, परंतु नोटा जमा करण्यावर ४ टक्के आणि नाण्यांच्या ठेवींवर सुमारे ५ टक्के शुल्क आकारले जात होते. आता यात बदल होत आहे. नवीन नियमांनुसार, २० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटांसाठी मासिक मर्यादा दहा हजार आहे, तर नाण्यांसाठी ही मर्यादा दरमहा पाच हजार आहे. या मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केल्यास त्यावर दोन टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

४. सोलर पॅनल महागणार?

१ जूनपासून सौर पॅनेलशी संबंधित नियम देखील बदलत आहेत. १ जून २०२६ पासून, सौर पॅनेलसाठी मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादक सूची लागू होईल. याच्या अंमलबजावणीमुळे, सरकारी योजना आणि इतर अनुदानित प्रकल्पांमध्ये केवळ या सूचीमध्ये समाविष्ट असलेले सौर मॉड्यूल आणि सेल वापरणे आवश्यक असेल. त्यांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता ठरवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे सौर पॅनेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

५. UPI च्या नियमात बदल

डिजिटल पेमेंट मधील ऑनलाइन फसवणूक आणि चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरित होण्याच्या दैनंदिन समस्येवर उपाययोजना करण्यासाठी, एनपीसीआयने १ जून २०२६ पासून एक नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार, कोणत्याही ऑनलाइन पेमेंट प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या कोणत्याही यूपीआय व्यवहारात, पिन टाकण्यापूर्वी व्यक्तीच्या बँक खात्याचे नाव दिसेल, ज्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होणार नाहीत.