
Punyashlok Ahilyadevi Holkar : नगर : केंद्र व राज्य सरकारने (Central and State Government) जनतेच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या. चौंडीच्या विकास आऱाखड्यानुसार विकासकामाला सरकार निधी पैसे कमी पडु देणार नाही. आम्ही जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण केले. आपले सरकार जनतेचे, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही उभे आहाेत. कर्जमाफी करत आहोत. अहिल्यादेवींच्या आदर्शाने महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहोत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) म्हणाले
अनेक मान्यवरांची उपस्थिती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी (ता. जामखेड) येथे रविवारी (ता. ३१) जयंती सोहळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार, विधानपरिषद सभापती राम शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, खासदार रामराव वडकुते, आमदार सुरेश धस, गोपीचंद पडळकर, मोनिका राजळे, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, उत्तम जानकर, सचिन कांबळे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, सुनील कर्जतकर, किरण लहामटे, अक्षय कर्डीले, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, माजी आमदार रामहरी रुपनवर, भीमराव धोंडे, पोपटराव गावडे, स्नेहलता कोल्हे, यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी व राज्यभरातून नागरिक उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, (Punyashlok Ahilyadevi Holkar)
अटकेपार झेंडा फडकवणारे महान योद्धे, अहिल्यादेवींनी कुळाचे नाव सार्थक केले. त्याग, न्यायप्रिय, स्त्रीशक्तीचे प्रतीक, युगप्रवर्तक आहेत. त्यांनी मानवता धर्म जपला. कौंटूबिक आघात सहन करुनही त्यांनी कार्य थांबवले नाही. केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या. चौंडीच्या विकास आऱाखड्यानुसार विकासकामाला सरकार निधी पैसे कमी पडु देणार नाही. आम्ही जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण केले. आपले सरकार जनतेचे, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही उभे आहेत. महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहोत. अहिल्यादेवीच्या आदर्शनाने काम करत आहोत. कर्जमाफीचे दिलेले अश्वासन पुर्ण करत आहोत. गोदा ते नर्मदा यात्रा सुरु केली. मुंबई- पुणे रस्त्यावर शिंगरोबाचे स्मारक उभारणार आहोत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, (Punyashlok Ahilyadevi Holkar)
अहिल्यानगर होळकर यांनी अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला. हुंडाबंदी, महिलांचे जीवन समृद्ध करण्यासाठी काम केले. काशी, आयोद्धा, पंढरपुर, तुळजापुर आदी देशभरातील धार्मिक स्थळाचा जिर्नोद्धार केला, घाट बांधले. अहिल्यादेवीने स्वतःच्या तिजोरीतून खर्च केला. समाजाच्या कल्याणासाठी काम केले म्हणून त्या लोकमाता ठरल्या. गरिबांनी रोजगार मिळवून दिला. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण कऱणाऱ्या पहिल्या महिला आहेत. चरित्र, कार्य आणि आदर्श तीनशे वर्षांनंतरही तेवढेच प्रेरणादायी आहे. चौंडीच्या विकासासाठी सरकारने पुढाकार घेतला येथील काम दर्जेदार, चांगली व्हावीत. त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटातून त्याचे कार्य जगात पोचले जाणार आहे. अहिल्यादेवीच्या कार्यावर बोलतानाच दादांची आठवण काढत सुनेत्राताई भावुक झाल्या. राज्यात दुष्काळमुक्तीसाठी आम्ही काम करणार आहोत.
दिलेली अश्वासन पुर्ण केली : देवेंज्र फडणवीस (Punyashlok Ahilyadevi Holkar)
पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. ३०) व रविवारी (ता. ३१) असे दोन दिवस चौंडी (ता. जामखेड) य़ेथे विविध कार्यक्रम झाले. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद सभापती तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समिती स्वागताध्यक्ष ना. प्रा. राम शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,यांच्या हस्ते सकाळी महाभिषेक व अभिवादन करुन महत्वाच्या कार्यक्रमामुळे मुख्य सभेला न थांबतामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल हरिभाऊ बागडे महत्वाचे कार्यक्रमासाठी निघून गेले. तत्पुर्वी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा समाजाला दिलेली अश्वासने पुर्ण केली आहेत. मराठा समाजाला जे जे शक्य ते दिले. अहिल्यादेवीनी हिंदु अस्मिता, सनातन धर्म जागृत ठेवला. अनेक अक्रमनानंतर सनातन धर्म जिवंत ठेवला. लोकशासन आणि प्रशासन कसं असू शकते हे अहिल्यादेवींनी दाखवून दिले. राज्यातील सर्व शक्तीस्थळाचा पुर्वविकास करण्याचा निर्धार केला आहे.
आठ दिवसात कर्जमाफी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Punyashlok Ahilyadevi Holkar)
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, अहिल्यादेवींनी केलेले जलसंधारणाचे काम, त्यांनी दिलेले विचार, शिकवनीनुसार काम करत आहोत. चौंडी विकासाचा बाराशे कोटीचा आराखडा बनवताना अजित दादांनी मोठे मदत केली. कृषी विभागाच्या माध्यमातून मेंढपाळासाठी वेगळी य़ोजना आणण्याचा प्रयत्न आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे दिली जाणारी शेतकरी कर्जमाफीची योजनेचा आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले.


