Unseasonal Rains : कर्जत : कर्जत शहर आणि तालुक्यातील बहुतांश महसुली मंडळ क्षेत्रात (Revenue Circle Areas) रविवारी (ता. ३१) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात तब्बल अर्धा तास अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) जोरदार हजेरी लावली. यात कर्जत मंडळात सर्वाधिक ३२ मिमी पावसाची नोंद झाली. तर मिरजगाव आणि खेड निरंक राहिले. या अवकाळी पावसाने ११ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, खंडाळा (ता.कर्जत) येथे वीज पडल्याने गायीचा मृत्यु (Death of a Cow) झाला असल्याची माहिती तहसीलदार रवी सतवन यांनी दिली.
नक्की वाचा : स्व. चंद्रभान घोगरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणी येथे अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन
अर्धा तास अवकाळी पावसाची हजेरी
रविवार (ता. ३१) सकाळपासूनच कमालीचा उकाडा जाणवत असताना संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. संध्याकाळी साडेआठ वाजता अचानक सोसाट्याचा वारा सुटला वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास कर्जत शहरासह तालुक्यातील इतर महसुली मंडळात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने मुळेवाडी, गुरव-पिंपरी, रुई-गव्हाण, खांडवी, चिंचोली रमजान, आळसुंदे, बर्गेवाडी आणि कोपर्डी येथील एकूण ११ घरांचे पडझड होत अंशतः नुकसान झाले असल्याची माहिती कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांनी दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मिरची पिकांचे जवळपास ९५ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त (Unseasonal Rains)
यासह खंडाळा (ता.कर्जत) येथील पशुपालकांची गाय वीज पडून मृत्युमुखी पडली. तसेच चापडगाव, तळवडी, निमगाव डाकू, भांबोरा, देशमुखवाडी आणि रुईगव्हाण या ६ गावातील १५४ शेतकऱ्यांचे डाळींब, आंबा, केळी, ढोबळी मिरची पिकांचे जवळपास ९५ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले. या नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी तालुका प्रशासनास दिले. रविवारी (ता. ३१) कर्जत तालुक्यातील १० महसुली मंडळात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे : कर्जत -३२.३ मिमी, राशीन – ११ मिमी, भांबोरा- २७.८ मिमी, कोंभळी – १६ मिमी, वालवड – २६.५ मिमी, कोरेगाव – २१.५ मिमी, कुळधरण – ६.३ मिमी, माही – ५.५ मिमी तर मिरजगाव आणि खेड महसुली मंडळात पावसाची नोंद झाली नाही.



