Abhijeet Dipke : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजित दिपके भारतात येणार; दिल्लीत करणार आंदोलन

0
Abhijeet Dipke : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजित दिपके भारतात येणार; दिल्लीत करणार आंदोलन
Abhijeet Dipke : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजित दिपके भारतात येणार; दिल्लीत करणार आंदोलन

नगर : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर,सोशल मिडियावरील प्रसिद्ध झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ते येत्या ६ जून रोजी भारतात परतणार (Returning to India on June 6th) आहेत. यावेळी ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत.

नक्की वाचा : LPG महागला, देशभरात आजपासून ५ मोठे बदल! वाचा सविस्तर…

…तर त्यांना आपला आवाज ऐकावंच लागेल  (Abhijeet Dipke)

अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या आंदोलनाची माहिती दिली. “आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन, भारतीय संविधानाच्या मार्गाने शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवला पाहिजे. जर आपण सर्वांनी मिळून आवाज उठवला, तर त्यांना आपला आवाज ऐकावाच लागेल,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना केले आहे. 

अवश्य वाचा : ‘प्राजक्त यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक’ – जयंत पाटील

अभिजीत दीपके ६ जूनला भारतात येणार  (Abhijeet Dipke)

आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट करताना दिपके म्हणाले, “मी शनिवारी, ६ जून रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचणार आहे. तिथून आम्ही सर्वजण संसदेच्या जवळ असलेल्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊ. तिथे जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली जाईल.” अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन याचिकेवर आतापर्यंत तब्बल ८ लाख विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांनी या मागणीचे समर्थन केले आहे. लखनऊ, जयपूर आणि महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत या मुद्द्यावरून तीव्र आंदोलने सुरू आहेत.