Ladki Bahin Yojana updates : लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले कारण 

0
Ladki Bahin Yojana updates : लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले कारण 
Ladki Bahin Yojana updates : लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले कारण 

नगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana updates) ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर योजना ठरली आहे. मात्र आता या योजनेतील पात्र महिलांची ई-केवायसी झाल्यानंतर जवळपास ८१ लाख महिलांना अपात्र (81 lakh women ineligible) ठरवण्यात आले आहे. ई-केवायसीनंतर या योजनेत १ कोटी ६६ लाख बहिणी अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. यावरून राज्यात गदारोळ निर्माण झाला आहे. आता यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नक्की वाचा : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजित दिपके भारतात येणार; दिल्लीत करणार आंदोलन

केवायसीसाठी दोन वेळा मुदतवाढ (Ladki Bahin Yojana updates)

आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज बाद झाल्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्या म्हणाल्या, “अर्ज बाद झालेले नाहीत. योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून सुरू झाली. केवायसी पूर्ण करण्याकरता सुरुवातीला तीन महिन्याचा कालावधी दिला होता. त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे एकूण आठ-दहा महिन्यांची वाढ झाली होती.”

अवश्य वाचा : भावगीतांचा स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याचे कारण काय? (Ladki Bahin Yojana updates)

“ई केवायसी फक्त लाडकी बहीण योजनेत नाहीय. तर, राज्याच्या ज्या ज्या डीबीटी योजना आहेत, त्या सर्वांना ई केवायसीची प्रक्रिया केली जाते. ८१ लाख आकड्यात फक्त ई-केवायसीच्या महिला नाहीत. तर, मुदतीत ई केवायसी न केलेल्या महिलाही आहेत. तसंच, गेल्या दहा महिन्यांपासून आयकर विभागाकडून डेटा मागवलेला होता. ज्यांचं उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा जवळपास १२ लाख महिलांचाही या ८१ लाख अपात्र महिलांमध्ये समावेश आहे. तर, ६५ वर्षांवरील साडेचार लाख महिलांचा समावेश आहे. १४ हजार महिला या सरकारी कर्मचारी होत्या, त्यामुळे त्यांनाही वगळण्यात आलं आहे”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

तटकरे पुढे म्हणाल्या की, ई-केवायसी करूनही ज्या महिलांना लाभ मिळाला नाही, त्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. कारण, कोणीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये. या छाननी मधून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वगळण्यात आलं आहे. कारण, दोन्हीपैकी एकाच शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. तर, ज्यांच्या नावावर वाहन आहे, त्यांनाही या योजनेतून वगळलं आहे. पण त्यातीलही काही लाभार्थ्यांनी वाहन नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांचीही फेरतपासणी होणार आहे.”