Vidhan Parishad Election : प्राजक्त तनपुरेंचा मार्ग सुकर? अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार नाही

0
Vidhan Parishad Election : प्राजक्त तनपुरेंचा मार्ग सुकर? अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार नाही
Vidhan Parishad Election : प्राजक्त तनपुरेंचा मार्ग सुकर? अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार नाही

Vidhan Parishad Election : नगर : अहिल्यानगरमध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांचे आठ अर्ज दाखल झाले आहे. भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी अर्ज दाखल केला नाही. तर खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील अर्ज दाखल केला नाही. यामुळे तनपुरे यांच्यासाठी ही निवडणूक आता सोपी झाली आहे.

हेही वाचा : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत

मविआकडून उमेदवार नाही

अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या अर्ज दाखल करणार अशी माहिती त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी यांनी दिली होती. मात्र लंके यांनी अर्ज दाखल केलाच नाही.

नक्की पहा : पाथर्डी शहरात दुचाकी आणि बसचा अपघात; वाहतूक विस्कळीत

या अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल (Vidhan Parishad Election)

करण ससाने, कमलेश हस्तीमल गांधी, मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ, प्राजक्त प्रसाद तनपुरे, दत्तात्रेय भाऊसाहेब पानसरे यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले असून दुसरीकडे ससाणे हे काँग्रेसचे असूनही त्यांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा पुरता गोंधळ दिसून आला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी उमेदवारी करण्याची तयारी केली होती. त्यांचे समर्थकाने थेट तसे जाहीर केले होते. परंतु शेवटपर्यंत त्यांनीही उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे त्यांनाही यूटर्न घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी ही निवडणूक ही सोपी झाली आहे.