Power Supply Disrupted : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत

मोठी झाडे व फांद्या कोसळल्या वीजवाहिन्यांवर

0
Power Supply Disrupted : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत
Power Supply Disrupted : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत

Power Supply Disrupted : नगर : अहिल्यानगर शहरांसह जिल्ह्यात रविवारी (ता.३१) सायंकाळी सुमारे ८:३० वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे (Due to Heavy Rains) महावितरणच्या वीज वितरण (Power Distribution) यंत्रणेला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित (Power Supply Disrupted) झाला असून वीज यंत्रणेचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

नक्की वाचा : महाविकास आघाडीने प्राजक्त तनपुरेंना बाय का दिला? काय आहे या मागील राजकारण

मोठी झाडे व फांद्या कोसळल्या वीजवाहिन्यांवर

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे व फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्या, तर काही ठिकाणी वीज खांब कोसळणे, काही ठिकाणी इन्सुलेटर्स तडकणे अथवा फुटणे तसेच इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये अतिरिक्त तांत्रिक बिघाड निर्माण होऊन वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.घटनेची माहिती मिळताच महावितरणने तात्काळ आपली यंत्रणा कार्यान्वित केली. अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी तसेच ठेकेदारांची मनुष्यबळे ह्यांनी मिळुन नुकसानग्रस्त ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू करून रात्री उशिरापर्यंत अनेक भागांतील जसे कि पराग बिल्डिंग , बाबा बंगाली, मार्केट यार्ड, केडगाव इत्यादी परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन (Power Supply Disrupted)

तसेच अशोका फिडर , गंजबाजार फिडर, दरेवाडी परिसरातील बराचसा भाग दुसर्या वाहिनीवरून वीजपुरवठा घेऊन त्या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.महावितरणच्या तत्पर प्रतिसादामुळे रात्रभर दुरुस्तीची कामे सुरू ठेवण्यात आली. तथापि, काही ठिकाणी नुकसानाचे प्रमाण अधिक असल्याने वीजपुरवठा दुरुस्त करण्यात रात्री यश आले नाही तथापि त्या भागात दुरुस्तीची कामे अद्याप सुरूच असून संबंधित भागांतील वीजपुरवठा देखील प्राधान्याने व शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, तुटलेल्या वीजतारा, पडलेले खांब किंवा वीज यंत्रणेचे नुकसान झाल्याचे आढळल्यास त्यास स्पर्श करू नये व तात्काळ महावितरणच्या स्थानिक कार्यालयास अथवा वीज तक्रार केंद्रास माहिती द्यावी.महावितरण वीजपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध असून सर्व बाधित भागांतील वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.