
Chandrashekhar Hase : अकोले : महाराष्ट्रभर पर्यावरण रक्षणाच्या कामात अग्रेसर असणार्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (Nature and Social Environmental Pollution Prevention Board) महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राज्य संघटकपदी अकोलेतील प्रा. चंद्रशेखर हासे (Chandrashekhar Hase) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे व संस्थेच्या कोअर कमिटीने त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
नक्की वाचा : पाथर्डी तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
या संस्थेमार्फत राज्यभर विविध उपक्रम राबवले जातात
स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ही संस्था पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करते. पर्यावरण रक्षणाच्या विविध कामांसाठी संस्था वनसंवर्धन, वृक्षारोपण, जंगलांचे वनवे रोखणे, पशुपक्ष्यांना आश्रय व चारा पाण्याची व्यवस्था करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी समाजात सामाजिक जाणीव जागृती करणे असे विविध उपक्रम राज्यभर या संस्थेमार्फत राबवले जातात.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वनसंपदा वाचवण्याचे काम प्राधान्याने करणार (Chandrashekhar Hase)
या संस्थेची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात प्रा. चंद्रशेखर हासे यांना राज्य कार्यकारणीतील राज्य संघटक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राज्याध्यक्ष प्रमोद मोरे, कोअर कमिटी सदस्य प्रा. महेश पाडेकर, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा समन्वयक विजय पांडे, प्रवीण मालुंजकर आदिंनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, अकोले तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आगी लावण्यात आल्या. याआगीत प्रचंड मोठी वनसंपदा व जैवविविधता जळून खाक झाली. पुढील वर्षापासून ही वनसंपदा वाचवण्याचे काम प्राधान्याने करणार असल्याचे प्रा. हासे यांनी सांगितले.


