Vrideshwar Factory: पाथर्डी: वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Vrideshwar Factory) पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारच्या अंतिम दिवशी १८ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले. यापूर्वी १९ उमेदवारांकडून २५ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे कारखान्याच्या १९ संचालक पदांसाठी एकूण ४४ उमेदवारी अर्ज निवडणूक प्रशासनाकडे (Election Administration) प्राप्त झाले आहेत. शिवशंकर राजळे यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रंगत वाढली आहे.
अवश्य वाचा- कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून एचआर हेडवर हल्ला
अंतिम दिवशी १८ उमेदवारांकडून १९ अर्ज दाखल (Vrideshwar Factory)
कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, व्हाईस चेअरमन रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, कुशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे,प्रदीप पाटील, संदीप लोखंडे, बापूसाहेब पाटेकर यांनी यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विद्यमान चेअरमन आप्पासाहेब राजळे,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, नारायण बर्डे, संभाजी गर्जे, उद्धव ससे, मल्हारी टकले, सुरेश आठरे, राजेंद्र गवळी, सिंधू बडे, शेषराव ढाकणे, बाळासाहेब गोल्हार, रामकिसन शिरसाट, शामराव गरड, अंबादास बळीद, काकासाहेब शिंदे, बाबासाहेब बर्डे, भाऊसाहेब उघडे आणि सुभाष आव्हाड यांनी अर्ज दाखल केले. सिंधू बडे यांनी दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतून अर्ज भरल्याने अंतिम दिवशी १८ उमेदवारांकडून १९ अर्ज दाखल झाले.माजी आमदार आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे यांनी तीन तर राहुल राजळे, सुभाष ताठे,बापूसाहेब पाटेकर, सिंधू बडे यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत.
नक्की पहा : विस्कळीत विजपुरवठ्यावरुन नगरकर संतापले…
माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे निवडणुकीच्या रिंगणात (Vrideshwar Factory)
दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत अधिक रंगत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.नामनिर्देशन पत्रांची छाननी ३ जून रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जून असून, अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप १९ जून रोजी करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.



