Attack on HR Head : कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून एचआर हेडवर हल्ला

Attack on HR Head : कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून एचआर हेडवर हल्ला

0
Attack on HR Head : कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून एचआर हेडवर हल्ला
Attack on HR Head : कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून एचआर हेडवर हल्ला

सुपा पोलिसांचा मोठा खुलासा! कट रचल्याच्या प्रकरणात चार आरोपी गजाआड; सतीश भालेकर यांचा शोध सुरू असल्याची चर्चा

Attack on HR Head : पारनेर : म्हसणेफाटा एमआयडीसी परिसरातील सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीच्या एचआर हेडवर हल्ला (Attack on HR Head) करून लुटमार केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी (Supa Police Station) कारवाई करत काही आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात एका युवक प्रतिष्ठानचा अध्यक्ष तथा सोशल मीडिया प्रमुख सतीश मोहन भालेकर यांनी कट रचल्याचा आरोप पोलिसांच्या (Police) प्रेस नोटमध्ये करण्यात आला आहे.

मोटारसायकल अडवून मारहाण

सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या कारणावरून संबंधितांकडून कंपनीच्या एचआर हेड यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याचा राग मनात धरून आरोपींनी कट रचल्याचा आरोप आहे. त्यानंतर कंपनीच्या एचआर हेड यांची मोटारसायकल अडवून त्यांना मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अन्य आरोपींचा शोधासाठी पोलीस पथके कार्यरत (Attack on HR Head)

या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वैभव रामदास रिकामे याला अटक करण्यात आली आहे. तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत.

सुपा पोलीस ठाण्याच्या वतीने एमआयडीसी परिसरातील सर्व उद्योग व्यवस्थापकांना आवाहन करण्यात आले आहे की, कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी दबाव टाकत असल्यास, पैशांची मागणी करत असल्यास किंवा धमकी देत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.