नगर : गेल्या महिन्यापासून देशात कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) जोरदार चर्चा सुरू आहे. या डिजिटल चळवळीने देशातील तरुणाईचे लक्ष वेधले आहे. बेरोजगारी आणि नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधात या पक्षाने एल्गार पुकारला आहे. तीन दिवसांनी दिल्लीत मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला आता प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह इतर अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या घडामोडींपूर्वी कॉकरोच जनता पार्टीने तीन प्रवक्त्यांची नावं जाहीर (Names of three spokespersons announced) केली आहे. एक्सवर अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी याविषयीची पोस्ट केली आहे. तर पक्षाच्या एक्स हँडलवरही ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
नक्की वाचा : अंजना कश्यप यांच शिक्षकांबद्दल वादग्रस्त विधान; प्रकरण नेमकं काय?
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते कोण? (Cockroach Janta Party)
कॉकरोच जनता पार्टीने एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, ज्या तीन प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जनता आणि मीडिया समोर आंदोलनाशी संबंधित सर्व माहिती देतील. कॉकरोच जनता पार्टीने शोध पत्रकार सौरव दास यांना मुख्य प्रवक्ते केले आहे. तर लेखक आणि निर्माता विजेता दहिया आणि IIT Kanpur चे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली आहे. सीजीपी भारताची राजकीय भाषा आणि विचार बदलण्याचे काम करत आहे. नवीन पिढीतील नेत्यांच्या नेतृत्वात हे काम करण्यात येईल,असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अवश्य वाचा : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मिळणार एमआयडीसीमध्ये नोकरी
अभिजीत दीपके हे ६ जून रोजी भारतात येणार (Cockroach Janta Party)
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे ६ जून रोजी भारतात येणार आहेत. त्यांनी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी जंतरमंतरवर प्रदर्शन करण्यात येईल.



