Accused Apprehended : श्रीगोंदा : घातक शस्त्रांचा वापर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुभाष कोंडीबा चौधरी (रा. चौधरी मळा, काष्टी, ता. श्रीगोंदा) याला श्रीगोंदा पोलिसांनी (Shrigonda Police) शिताफीने अटक (Accused Apprehended) केली आहे. तो गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता.
नक्की वाचा : टिकाव डोक्यात घालून मुलाने केला बापाचा खून; श्रीरामपूर तालुक्यात घडली घटना
सापळा रचून शिताफीने पकडले
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बी.एन.एस. आणि आर्म अॅक्टच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अटक चुकवण्यासाठी पळून फिरत होता. त्याच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने श्रीगोंदा, काष्टी, दौंड, यवत, बारामती, पुणे, कोल्हापूर भागात माग काढला, मात्र सराईत असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता. २ जून रोजी आरोपी पळून जात असताना, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने पकडले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई (Accused Apprehended)
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, पोलीस कर्मचारी संदीप राऊत, वैजीनाथ कुटे, रविंद्र पाचारणे आणि बबन साळवे यांच्या पथकाने केली.



