School Open : ‘या’ तारखेला वाजणार शाळेची घंटा; ‘ऑनलाइन’च्या चर्चांना पूर्णविराम

0
School Open : ‘या’ तारखेला वाजणार शाळेची घंटा; ऑनलाइनच्या चर्चांना पूर्णविराम
School Open : ‘या’ तारखेला वाजणार शाळेची घंटा; ऑनलाइनच्या चर्चांना पूर्णविराम

School Open : नगर : युद्धजन्य परीस्थितीमुळे वाढलेले पेट्रोल-डिझेलचे भाव आणि उन्हाचा वाढता चटका यामुळे यंदा शाळा उशिरा सुरू होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच, शाळा ऑनलाइन सुरू करण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते. परंतु, असे काहीही न होता यंदा 15 जूनपासूनच शैक्षणिक वर्षांचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीनेच होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा : टिकाव डोक्यात घालून मुलाने केला बापाचा खून; श्रीरामपूर तालुक्यात घडली घटना

ऑफलाईन शाळा

दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा 15 जूनपासूनच करण्यात येणार आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, शाळादेखील पारंपरिक पद्धतीनेच ऑफलाईन सुरू होणार आहेत. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर योग्य निर्णय घ्यायचा आहे.

नक्की पहा : बुऱ्हाणनगर रस्ता कचऱ्याच्या विळख्यात; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी

विदर्भात सकाळी भरणार शाळा (School Open)

विदर्भ, तसेच इतर सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू करण्यात याव्यात. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता 15 जून ते 29 जून या कालावधीत सकाळी 7 ते 11.45 या वेळेत सुरू करण्यात याव्यात, 30 जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.