ATS : अहिल्यानगर जिल्ह्यातील युवक पाकिस्तानी गॅंगस्टरच्या संपर्कात; श्रीरामपूरचे नेटवर्क एटीएसकडून उघड

0
ATS : अहिल्यानगर जिल्ह्यातील युवक पाकिस्तानी गॅंगस्टरच्या संपर्कात; श्रीरामपूरचे नेटवर्क एटीएसकडून उघड
ATS : अहिल्यानगर जिल्ह्यातील युवक पाकिस्तानी गॅंगस्टरच्या संपर्कात; श्रीरामपूरचे नेटवर्क एटीएसकडून उघड

ATS : नगर : गेल्या काही काळापासून विविध कारणांसाठी गाजत असलेल्या श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी गँगस्टरने नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र एटीएसने काल (ता. ०३) केलेल्या कारवाईत हे नेटवर्क उघड झाले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांकडील प्राथमिक चौकशीत पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :  मान्सून केरळमध्ये दाखल; भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा

सोशल मीडियाद्वारे संपर्कात

या चौघांना सध्या नोटीस देऊन सोडून देण्यात आले असले तरी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची न्यायवैद्यक तपासणी सुरू आहे. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई होईल. मात्र, पाकिस्तानी गँगस्टरने श्रीरामपूरमधील युवक गळाला लावल्याचे आढळून आले. येथील युवक पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याची आणि त्या माध्यामातून शहरात काही अनुचित घडवून आणणार असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. सोशल मीडिच्या माध्यामातून काही युवक पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्यावर एटीएसच्या पथकांनी शहरात जाऊन छापे टाकले. त्यातून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण 20 वर्षांच्या आतील आहेत. 

नक्की पहा : एसटी महामंडळाने लाटली जमीन; सावेडीतील ‘त्या’ जागेबाबत गंभीर आरोप

हिंदुत्ववादी नेत्यांच्या घरांची पाहणी (ATS)

भारतातील तरुणांना गळाला लावून काम करून घेण्याची पाकिस्तानी गँगस्टरांची पद्धत असल्याचे समोर आले. काही युवकांनी शहरातील हिंदुत्ववादी नेते, काही प्रतिस्पर्धक यांच्या घरांची पाहणी केल्याचे, त्याचे व्हिडिओ शेअर केल्याचेही प्राथमिक चौकशीत आढळून आले. सुदैवाने एटीएसला लवकर माहिती मिळाली आणि तातडीने कारवाई झाली, त्यामुळे पुढील प्रकार टळले आहेत. आता आपला प्लॅन उघडकीस आल्याचे पाकिस्तानी गँगस्टरांच्या लक्षात आल्याने आता त्यांच्याकडूनही काही काळ तरी कारवाया थांबविल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात यापुढे एटीएस आणि पोलिसांना यासंबंधाने अधिक सतर्क रहावे लागणार आहे.