Fasting : कोळसांगवी-जिरेवाडी रस्त्यासाठीचे उपोषण मागे; राजळे यांची आंदोलकांशी दूरध्वनीवरून चर्चा

पुन्हा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणार

0
Fasting : कोळसांगवी-जिरेवाडी रस्त्यासाठीचे उपोषण मागे; राजळे यांची आंदोलकांशी दूरध्वनीवरून चर्चा
Fasting : कोळसांगवी-जिरेवाडी रस्त्यासाठीचे उपोषण मागे; राजळे यांची आंदोलकांशी दूरध्वनीवरून चर्चा

Fasting : पाथर्डी : कोळसांगवी ते जिरेवाडी या नदीवरील पुलासह रस्त्याच्या कामासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले महिलांचे आमरण उपोषण (Fasting To The Death) अखेर बुधवारी (ता. ३) प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. उपोषणकर्त्या महिलांना पाणी पाजून आंदोलन (Protest) स्थगित करण्यात आले. आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून सकारात्मक चर्चा केली. 

नक्की वाचा : शंकरवाडी येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त

पुन्हा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणार

यावेळी त्यांनी सांगितले की, संबंधित रस्त्याचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काही दिवसांपूर्वी अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला होता. मात्र, या कामासाठी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. रस्त्यासाठी पुन्हा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच डीपीडीसी अथवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेपैकी कोणत्याही एका योजनेतून रस्ता व पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

काम पूर्ण करण्याबाबत दिले लेखी आश्वासन (Fasting)

पंचायत समिती पाथर्डीचे अभियंता राम राजळे यांनी तात्पुरत्या स्वरूपात सुमारे ३०० ते ४०० फूट पांदीच्या रस्त्यावर तत्काळ सेलिंग व मुरूम टाकून वाहतुकीची सोय करण्यात येईल, असे सांगितले. तसेच जिल्हा परिषद किंवा इतर उपलब्ध योजनांमधून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून मंजुरी मिळवून रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्या महिलांनी आंदोलन मागे घेतले.

यांची उपस्थिती

उपोषणात सुरेखा फुंदे, खतिजाबी शेख, कमल धनवडे, कमल माळी, गंभीराबाई पेटारे, छबाबाई जाधव, सायरा शेख, मनीषा साळवे, शोभा पेटारे, सिंधुबाई पेटारे, संगीता कुसळकर, विमल माळी, द्रौपदी साळवे, चंद्रकला कुसळकर, आशा जाधव, आबिदाबी शेख, प्रयागाबाई वाकडे, आयशाज शेख, शांताबाई धनवडे, तस्लिम शेख आणि शहानूरा शेख सहभागी झाल्या होत्या.यावेळी बशिर शेख, दगडू धनवडे, उपसरपंच रावसाहेब माळी, मुकुंद आंधळे, जिरेवाडीचे सरपंच रवि गाडे, गुलाबराव घुले, युवराज फुंदे, शैकत शेख, ज्ञानदेव साळवे, मुरलीधर साळवे, विकास पेटारे, अतुल घुले, कुंडलिक जाधव, आदेश साळवे, गणेश धनवडे, बबन माळी, विजय कुसळकर, चांगदेव कुसळकर, रोहित घुले हे उपस्थित होते.