Theft : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’

सर्वजण गाढ झोपेत असताना चोरट्यांचा टेंटमध्ये प्रवेश

0
Theft : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’
Theft : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’

Theft : अकोले : तालुक्यातील पांजरे येथील विलसन व्हॅली कॅम्पिंग परिसरात काजवा महोत्सवानिमित्त (Firefly Festival) मुक्कामासाठी आलेल्या पर्यटकांना चोरट्यांनी लक्ष्य करत मोबाईल व लॅपटॉपची चोरी (Theft of mobile phones and laptops) केल्याची धक्कादायक घटना घडली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत टेंटमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी दोन मोबाईल व एक लॅपटॉप असा सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : खांबे गावात काँग्रेसला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सर्वजण गाढ झोपेत असताना चोरट्यांचा टेंटमध्ये प्रवेश

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर (पुणे) येथील खासगी नोकरदार प्रकाश जनार्दन यादव (वय ४४) हे पत्नी सारिका यादव, मेहुणी जगदाळे व इतर कुटुंबियांसह काजवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी ३ जून रोजी पांजरे येथे आले होते. त्यांनी विलसन व्हॅली कॅम्पिंग येथे ऑनलाईन बुकिंग करून टेंटमध्ये मुक्काम केला होता. रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी टेंटमध्ये प्रवेश करून मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. पहाटे सुमारे ३ वाजता जाग आल्यानंतर प्रकाश यादव यांना स्वतःचा मोबाईल दिसून आला नाही. त्यानंतर इतर सदस्यांच्या वस्तूंची तपासणी केली असता आणखी एक मोबाईल व लॅपटॉपही चोरीस गेल्याचे उघड झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला (Theft)

यामध्ये प्रकाश यादव यांचा मोबाईल (किंमत ४० हजार रुपये), सारिका यादव यांचा काळ्या रंगाचा लॅपटॉप (किंमत ५० हजार रुपये) तसेच मेहुणी जगदाळे यांचा मोबाईल (किंमत ४० हजार रुपये) असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तक्रार दाखल होताच राजूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सात संशयितांची नावे निष्पन्न केली. यामध्ये गणेश जालिंदर मेमाने (वय १९), सोनू वसंत केकरे (वय २१), राहुल सुनील घारे (वय २३), करण प्रभाकर घोडे (वय १९), समाधान तुळशीराम शेगे (वय २१), रोहित काशीनाथ घोडे (वय १९) हे इगतपुरी तालुक्यातील दरानेवाडी, कचरवाडी व काळुस्ते परिसरातील रहिवासी असून अजय अशोक खाडे (वय २०, रा. मुरशेत, ता. अकोले) याचाही संशयितांमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी गणेश मेमाने व सोनू केकरे यांच्याकडून चोरीतील काही मोबाईल हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.