Hanga Lake : पारनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हंगा तळ्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक

पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याचे आवाहन

0
Hanga Lake : पारनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हंगा तळ्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक
Hanga Lake : पारनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हंगा तळ्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक

Hanga Lake : पारनेर : मागील वर्षी पारनेर शहर (Parner City) आणि परिसरात मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने येथील नद्या, नाले आणि हंगा तळे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. त्यामुळे पारनेर शहराला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या हंगा तळ्यामध्येही (Hanga Lake) पाण्याचा मोठा साठा उपलब्ध होता आणि तळे ओसंडून वाहत होते. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, चालू उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले असून, तळ्यातील पाणी पातळी आता चिंताजनक पातळीवर खाली आली आहे. सध्या या तळ्यात केवळ १५ टक्केच पाणी साठा शिल्लक राहिला आहे.

नक्की वाचा : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे

महिना ते दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध

या संदर्भात माहिती देताना पारनेर नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी सांगितले की, “उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हंगा तळ्यातील पाणी साठा झपाट्याने कमी झाला आहे. सद्यस्थितीत तळ्यात साधारण महिना ते दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. जर येत्या काळात पावसाचे लवकर आगमन झाले नाही, तर शहरावर गंभीर पाणी संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.”शिल्लक असलेला पाणी साठा आगामी दीड महिना पुरवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने पाण्याचे योग्य आणि अत्यंत काटकसरीने नियोजन करण्याचे ठरवले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याचे आवाहन (Hanga Lake)

पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी पारनेर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.गाड्या धुणे, अंगणात पाणी मारणे यांसारख्या गोष्टींसाठी पाण्याचा गैरवापर थांबवून, केवळ पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठीच पाणी जपून वापरावे. जलसंकटाचा सामना करण्यासाठी केवळ प्रशासनाचे नियोजन पुरेसे नसून, त्याला लोकसहभागाची अत्यंत गरज आहे. आगामी काळात पाणी टंचाईची तीव्रता भासू नये म्हणून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.