नगर : लाडकी बहीण योजनेच्या (Ladaki Bahin Yojana) मे महिन्याच्या हफ्त्याची वाट पाहताय, पण अजून काही अपडेट मिळेना का, तर थांबा, कारण लवकरच तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे (Installment) जमा होणार आहेत. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, पण अजून १५०० रूपयांच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिला मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या १५ तारखेनंतर जमा झाला होता. आता मे महिन्याचा हप्ता (May Installment) कधी जमा होणार? असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात असून महिलांमध्ये चिंतेचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा : कर्जमाफी जाहीर पण कोणते शेतकरी पात्र ठरणार? ‘एकवेळ समझोता’ नेमकं काय?
किती महिला ठरल्या अपात्र? (Ladaki Bahin Yojana)
ईकेवायसी पडताळणीनंतर लाडकी बहीण योजनेतील अनेक महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. माहिती नुसार ८० लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. तर १ कोटी ६६ लाख महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. मैत्रिणींनो घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
अवश्य वाचा : ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!
मे महिन्याचे पैसे कधी येणार? (Ladaki Bahin Yojana)
सरकारकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या १२ ते १५ जून दरम्यान सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण रखडण्यामागे बँक खात्यांचे ‘डीबीटी’ अपडेशन हे कारण असू शकते. तसेच अनेक महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे किंवा बँक खात्यात त्रुटी असणे यामुळेही पैसे जमा होण्यास अडचण येत आहे.
जर तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचणी येत असतील तर
तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासा.
बँक खात्याचे डीबीटी (DBT) स्टेटस ॲक्टिव्ह असल्याची खात्री करा. तसेच
लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल किंवा ॲपवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती ‘मंजूर’ आहे ना, हे एकदा नक्की चेक करा.
त्यामुळे टेन्शन घेऊ नका, योजनेसाठी तुम्ही जर पात्र असला तर तुमच्या खात्यात पैसे हे येणारच. तुमच्या ही मैत्रिणी जर लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट पाहत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.



