नगर : पुणे जिल्ह्यात (Pune Crime) गुन्हेगारी वाढली असून, आज (ता.५)शुक्रवारी भरदुपारी दौंड तालुक्यातील पाटसमध्ये गोळीबाराची (Shooting in Patus) घटना घडली. दोन गटांमध्ये झालेला वाद कोपाला गेल्याने हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. त्याचवेळी काही तरुणांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार (Pistol shooting) केला. आता या प्रकरणी पोलिसांनी काही संशयित तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींना मे महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार?
नेमकं काय घडलं? (Pune Crime)
पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या परिसरात काष्टीतील काही तरुणांचा गट आणि पाटसमधील तरुणांच्या गटात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारी झाली. संतापलेल्या काही तरुणांनी जवळील गावठी पिस्तुल बाहेर काढला आणि तीन राउंड फायर केले,अशी प्राथमिक माहिती समोर आली. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काही संशयित तरुणांना ताब्यात घेतलं.
अवश्य वाचा : भारतातील महिलांना वारंवार का होतं यूरिन इंफेक्शन? डॉक्टरांचे म्हणणे काय?
पोलीस गेल्यानंतर झाला वाद (Pune Crime)
घटनास्थळावरून काही रिकामी काडतुसे जप्त करण्यात आलीत. गोळीबाराच्या घटनेआधीही दोन गटांत वाद झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा तणाव निवळला होता. मात्र, पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा वाद झाला आणि त्यानंतर गोळीबाराची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पाठलाग करून तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. काही संशयित आरोपी जवळच्या ऊसाच्या शेतात घुसले. काही वेळाने पोलिसांनी ऊसाच्या शेताला वेढा घालून संशयितांचा शोध सुरू केला.



