Accused Carrying a Sharp Sword : धारदार तलवार बाळगून दहशत करणारा संशयित आरोपी कोतवली पोलिसांकडून जेरबंद

Accused Carrying a Sharp Sword : धारदार तलवार बाळगून दहशत करणारा संशयित आरोपी कोतवली पोलिसांकडून जेरबंद

0
Accused Carrying a Sharp Sword : धारदार तलवार बाळगून दहशत करणारा संशयित आरोपी कोतवली पोलिसांकडून जेरबंद
Accused Carrying a Sharp Sword : धारदार तलवार बाळगून दहशत करणारा संशयित आरोपी कोतवली पोलिसांकडून जेरबंद

Accused Carrying a Sharp Sword : नगर : अहिल्यानगर शहरातील सैनिक लॉन ते जुने कलेक्टर कार्यालय मार्गावर धारदार तलवार हातात घेऊन फिरत (Accused Carrying a Sharp Sword) नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) तात्काळ कारवाई करून जेरबंद केले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने गस्त

संतोष राजू गाडे (वय ४१, रा. तांबे मळा, व्हीआरडीई, बुरुडगाव, ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील हे सहकाऱ्यांसह हद्दीत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दूरध्वनीवरून सैनिक लॉन ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

घटनास्थळी धाव घेत संशयित ताब्यात (Accused Carrying a Sharp Sword)

यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. दोन पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी तलवार आढळून आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस अंमलदार राहुल शिंदे, दौंड, विनोद बोरगे, विशाल दळवी, शाबीर शेख, दिपक रोहोकले, सत्यम शिंदे, सुरज कदम, अतुल काजळे, पोकॉ अमोल गाडे, पोकॉ रमेश शिंदे, पोकॉ शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, संकेत धिवर, अतुल लाटे आणि पल्लवी रोहोकले यांच्या पथकाने केली आहे.