Stormy Winds : साकूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; जांबुतमध्ये घरांचे पत्रे उडाले

Stormy Winds : साकूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; जांबुतमध्ये घरांचे पत्रे उडाले

0
Stormy Winds : साकूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; जांबुतमध्ये घरांचे पत्रे उडाले
Stormy Winds : साकूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; जांबुतमध्ये घरांचे पत्रे उडाले

Stormy Winds : संगमनेर : तालुक्यातील साकूर परिसरात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह (Stormy Winds) गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे (Stormy rain) परिसरात हाहाकार उडाला होता. जवळपास १ तास चाललेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने परिसरात अक्षरशः थैमान घातल. यावेळी परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. तसेच उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात (Weather conditions) गारवा निर्माण झाला आहे. पावसाने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या वादळी वाऱ्याने साकूर – मांडवे रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूकीसाठी खोळंबा झाला होता.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

तसेच जांबुत खुर्द व जांबुत बुद्रुक येथे वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे, कौले उडून गेले आहे. या वादळात जांबुत खुर्द येथील डोंगरे मळ्यात राहणाऱ्या दस्तगीर शब्बीर पठाण यांच्या घराचे पत्रे व कौले उडून गेले आहे. तसेच जांबुत बुद्रुक येथील पासुडी वस्तीवर राहत असलेल्या चाॅंदबी फारुक सय्यद यांच्या राहत्या घराचे संपूर्ण पत्रेच उडून गेल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच त्यांच घरातील सर्व साहित्य भिजून गेले आहे. वादळी वाऱ्याने घराचा पत्रा अक्षरशः १०० फुट अंतरावर उडून गेला होता. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Stormy Winds : साकूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; जांबुतमध्ये घरांचे पत्रे उडाले
Stormy Winds : साकूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; जांबुतमध्ये घरांचे पत्रे उडाले

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

रस्त्यावर झाड पडल्याने एक तास रस्ता बंद (Stormy Winds)

तसेच परिसरात ठिकठिकाणी झाडे वादळी वाऱ्यात उन्मळून पडले आहे. जांबुत बुद्रुक ते जांबुत खुर्द रस्त्यावर झाड पडल्याने जवळपास एक तास रस्ता बंद झाला होता. मात्र उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी तातडीने धाव घेत नागरिकांच्या साहाय्याने रस्तावरील झाड बाजूला करत रस्ता खुला करण्यात आला. यावेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी केली आहे.