TET Exam : २८ जूनला शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा; ३१ हजार ६५५ शिक्षकांची नोंदणी

0
TET Exam : २८ जूनला शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा; ३१ हजार ६५५ शिक्षकांची नोंदणी
TET Exam : २८ जूनला शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा; ३१ हजार ६५५ शिक्षकांची नोंदणी

TET Exam : नगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी महाटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) २८ जून रोजी जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रांवर होत आहे. जिल्ह्यातील ३१ हजार ६५५ जणांनी महाटीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा परीक्षा नियोजन व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा : ‘जलसंपदा’चे कार्यालय नगरमधून हलविण्यास विरोध; खासदार लंके यांचा आंदोलनाचा इशारा

५३ परीक्षा केंद्रे

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १३ हजार ४९१ शिक्षकांनी पेपर क्रमांक १ साठी, तर १८ हजार १६४ शिक्षकांनी पेपर क्रमांक २ साठी नोंदणी केली आहे. नगर शहरात दोन्ही पेपरसाठी एकूण ५३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील तर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यावर सहनियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची जिल्हा परिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नक्की पहा : संगमनेर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; घरांचे पत्रे उडाले

आढावा बैठक (TET Exam)

परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळिक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, ज्येष्ट अधिव्याख्याता शिवाजी औटी उपशिक्षणाधिकारी संजयकुमार सरवदे विस्तार अधिकारी मनीषा कुलट, भिवसेन पवार व महिला हवालदार भावना ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.