Water Resources Department Office : ‘जलसंपदा’चे कार्यालय नगरमधून हलविण्यास विरोध; खासदार लंके यांचा आंदोलनाचा इशारा

उत्तरेकडील काही भागात महत्त्वाचे प्रकल्प वळवल्याचा आरोप

0
Water Resources Department Office : 'जलसंपदा'चे कार्यालय नगरमधून हलविण्यास विरोध; खासदार लंके यांचा आंदोलनाचा इशारा
Water Resources Department Office : 'जलसंपदा'चे कार्यालय नगरमधून हलविण्यास विरोध; खासदार लंके यांचा आंदोलनाचा इशारा

Water Resources Department Office : नगर : जलसंपदा विभागाचे कार्यालय (Water Resources Department Office) अहिल्यानगर (नगर) शहरातून लोणी येथे हलविण्याचा प्रयत्न सुरू असून हा निर्णय स्थानिक जनतेच्या आणि शहराच्या अस्मितेच्या विरोधात असल्याचा आरोप खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, हा निर्णय तातडीने रद्द न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

नक्की वचा : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’

पदाचा गैरवापर करून हे पाऊल उचलले

खासदार लंके म्हणाले की, यापूर्वी नगरजवळील पिंपळगाव माळवी येथे प्रस्तावित असलेले विमानतळ शिर्डीकडे वळविण्यात आले. आता जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे कार्यालयही लोणीकडे हलविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या पदाचा गैरवापर करून हे पाऊल उचलले जात असल्याचा दावा त्यांनी केला. “हे कार्यालय हलविल्यानंतर त्या जागी एखादी खाजगी कंपनी किंवा संस्था आणण्याचा डाव असू शकतो. हा केवळ प्रशासकीय विषय नसून नगरच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे कार्यालय नगर शहरातून हलू देणार नाही,” असे लंके यांनी स्पष्ट केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

उत्तरेकडील काही भागात महत्त्वाचे प्रकल्प वळवल्याचा आरोप (Water Resources Department Office)

कार्यालय हलविण्याची मागणी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांनी केली, हे संबंधितांनी स्पष्ट करावे, असे आव्हान देत त्यांनी शेवगाव, पारनेर आणि संगमनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांचा दाखला मागितला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांच्या वाटपावरही टीका केली. उत्तरेकडील भागात काही महत्त्वाचे प्रकल्प वळविण्यात आल्याचा आरोप करत, मोठी जमीन उपलब्ध असतानाही काही उद्योग किंवा प्रकल्प अन्य भागात नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे मंत्री हे संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात, केवळ एका भागाचे नाहीत, असे सांगत लंके यांनी शिर्डीवर अधिक भर दिला जात असल्याचा आरोप केला.

अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात

“पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री शिर्डीला येतात, मात्र जिल्ह्यातील इतर भागांकडे दुर्लक्ष होते. जामखेडसारख्या भागातही केंद्रीय मंत्र्यांना आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा,” असे ते म्हणाले.दरम्यान, शेतकरी आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारवर टीका केली. अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून केवळ पंचनामे होतात, मात्र प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बेरोजगारी वाढत असून व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारने तरुणांच्या प्रश्नांकडे आणि रोजगारनिर्मितीकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.