Shivrajyabhishek Din : पारनेर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे (Shivrajyabhishek Din) औचित्य साधून पारनेर येथे एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक प्रसाद तारे (Prasad Tare) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘शिवरायांचे कैसे वागणे’ या विशेष ऑनलाइन व्याख्यान सप्ताहाला इतिहासप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. उपसरपंच विजय डोळ (Vijay Dol) यांच्या पुढाकारातून या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नक्की वाचा : पाण्याच्या प्रश्नाने माळीबाभुळगावकर त्रस्त; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी
१४ अभ्यासपूर्ण व्याख्याने प्रसारित
साधारणपणे ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या ‘अखंड हरिनाम सप्ताहा’च्या धर्तीवर, बदलत्या काळाची पावले ओळखून या व्याख्यान सप्ताहाचे आयोजन पूर्णतः ऑनलाइन माध्यमातून करण्यात आले. १ जून ते ७ जून या कालावधीत होत असलेल्या या व्याख्यानमालेत दररोज दोन सत्रांमध्ये एकूण १४ अभ्यासपूर्ण व्याख्याने प्रसारित झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवचरित्रातील सुवर्णक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला.या व्याख्यान सप्ताहात छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, स्वराज्यनिर्मितीचा लढा, राज्याभिषेकाचे महत्त्व, महाराजांची प्रगत युद्धनीती, आरमार आणि उत्कृष्ट प्रशासन अशा विविध विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
श्रोत्यांच्या शंकांचे निरसन होऊन संवाद अधिक जिवंत (Shivrajyabhishek Din)
प्रसाद तारे यांनी केवळ पुस्तकी माहिती न देता, अनेक अपरिचित ऐतिहासिक संदर्भ आणि संशोधनाधारित तथ्ये मांडली. विशेष म्हणजे, प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात ही व्याख्याने झाल्यामुळे श्रोत्यांच्या शंकांचे निरसन होऊन संवाद अधिक जिवंत झाला.प्रसाद तारे हे शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर सहा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. तसेच, महाराजांचा रंगीत छपाई असलेला ‘चरित्रकोश’ तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे.
शिवभक्तांना इतिहास अधिक जवळून अनुभवायला मिळाला
इतकेच नव्हे, तर इतिहासाच्या पानांत हरवलेली महाराजांची चार अस्सल चित्रे शोधून ती जगासमोर आणण्याचे मोलाचे कार्यही त्यांनी केले आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या सप्ताहामुळे शिवभक्तांना इतिहास अधिक जवळून अनुभवायला मिळाला. इतिहासाचे जतन आणि प्रचार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा प्रभावी वापर करता येतो, याचे उत्तम उदाहरण पारनेरकरांनी या उपक्रमाद्वारे घालून दिले आहे. या अभिनव व्याख्यानमालेचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.



