Bhingar Camp Police : नगर : भिंगार येथील स्नेहालय (Snehalaya) संचलित बालभवन शाळेत झालेल्या चोरीचा गुन्हा कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) उघडकीस आणत एका संशयितास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘शिवरायांचे कैसे वागणे’ व्याख्यान सप्ताहाचे आयोजन
दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश
याबाबत अंजुम सगीर शेख (वय ४२, रा. मोमीनगल्ली, भिंगार) यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, ४ जून रोजी रात्री साडेआठ ते ५ जून रोजी सकाळी दहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने स्नेहालय संचलित बालभवन शाळेच्या बंद इमारतीचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर शाळेतील ४२ इंची दूरचित्रवाणी संच तसेच इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
काकडे यानेच चोरी केल्याचे निष्पन्न (Bhingar Camp Police)
गुन्ह्याचा तपास सुरू असताना कॅम्प पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान साहिल राजू काकडे (वय २३, रा. सदरबाजार, भिंगार) यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सखोल चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार योगेश पवार रेवणनाथ दहिफळे, दीपक शिंदे, रवींद्र टकले, प्रमोद लहारे, कैलास शिरसाठ, पांडुरंग खेडकर आणि राजू अकोलकर यांच्या पथकाने केली आहे.



