नगर : आपल्या फोन मध्ये इंस्टाग्राम नाही,असं आता तरी होऊ शकत नाही. कारण इंस्टाग्रामवरील रील्स (Instagram Reels Trends) भारतात मनोरंजन आणि माहितीचा एक प्रमुख स्रोत बनले आहे. २०२६ मध्ये भारतीय वापरकर्ते रील्सवर कोणत्या प्रकारचा कंटेंट (Reels Content In India) सर्वाधिक पाहतात, हे मेटाने (Meta Survey) केलेल्या एका नवीन अभ्यासात समोर आले आहे.
नक्की वाचा : १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीसाठी बीसीसीआयने बदलला ‘तो’ महत्वाचा नियम
कोणी केले सर्वेक्षण? (Instagram Reels Trends)
इप्सॉस या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील २३ शहरे आणि ग्रामीण भागांतील ४ हजारांहून अधिक लोकांचा समावेश होता. या अहवालानुसार, भारतात कोणत्या विषयाशी संबंधित कंटेंट लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे याची माहिती त्यांना मिळाली आहे. इप्सॉस ही फ्रान्समधील पॅरिस इथे मुख्यालय असलेली जगातील तिसरी सर्वात मोठी मार्केट रिसर्च आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. ही कंपनी ग्राहक वर्तन, जनमत आणि ब्रँड विश्लेषणावर डेटा आधारित संशोधन करते. त्यांनीच हा रिसर्च केला असून त्यामध्ये वेगवेगळे खुलासे समोर आले आहेत.
अवश्य वाचा : आता MPSC परीक्षेचे नियम झाले कडक; कारण नेमकं काय?
सर्वाधिक पसंती कशाला? (Instagram Reels Trends)

मेटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात सर्वात लोकप्रिय रील्स कंटेंट फॅशन आणि ट्रेंड्स या श्रेणीमधला आहे. सौंदर्य, मेकअप हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. सुमारे ५२ टक्के युजर या दोन विषयांशी संबंधित रील्सना सर्वाधिक प्रतिसाद देतात. त्यापाठोपाठ आहे लाइफस्टाइल आणि फिटनेस. या दोन कंटेंटला ४२ टक्के प्रतिसाद मिळताना दिसतो. याशिवाय विनोदी व्हिडिओना ३९ टक्के, क्रीडा कंटेंटला ३८ टक्के आणि प्रवासाशी संबंधित व्हिडिओंना ३७ टक्के प्रतिसाद मिळाल्याचे अहवालात दिसून आलं आहे.
इप्सॉसने केलेल्या या संशोधनात एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवण्यात आले की, भारतीय युजर्स आता रील्स हे केवळ मनोरंजनासाठीच नव्हे, तर फिटनेस, फॅशन आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित माहितीसाठी ही पाहताना दिसतात आणि त्यावर कमेंटही करतात आणि ते रील्स फॉरवर्डही करतात. या सगळ्या वरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की, रील्सने लोकांच्या खरेदीच्या सवयींवर प्रभाव टाकला आहे. ८१ टक्के लोक नव्या वस्तूची माहिती रील्समधून मिळवतात, ६६ टक्के लोक ब्रँडचा विचार करण्यापूर्वी रिल पाहतात आणि अंतिम खरेदीत ४७ टक्के रील्सचा प्रभाव असतो.
हा प्रभाव ‘जनरेशन झेड’ म्हणजेच Gen Z युजर्स मध्ये आणखी जास्त आहे. अहवालानुसार, ८४ टक्के जेन झी युजर्स मेटा प्लॅटफॉर्मद्वारे नवीन उत्पादने आणि ब्रँड्स शोधतात. अगदी ग्रामीण भारतातही, ७३ टक्के लोक नवीन ब्रँड्ससाठी यावर विश्वास ठेवतात. अहवालानुसार, शहरी भारतातील दैनंदिन व्हिडिओ एंगेजमेंट ९८ टक्के होती, तर ग्रामीण भारतात हा आकडा ९४ टक्के होता. हा फरक खूपच कमी आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांत हा आकडा सारखाच असल्याचे दिसून येत. त्यामुळे शहरी भाग असो वा ग्रामीण इंस्टाग्रामचा वापर सगळेच करतात.आणि पाहणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड आहे.



