Nashik Kumbh Mela 2027 : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मार्गदर्शकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

Nashik Kumbh Mela 2027 : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मार्गदर्शकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

0
Nashik Kumbh Mela 2027 : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मार्गदर्शकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
Nashik Kumbh Mela 2027 : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मार्गदर्शकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

​Nashik Kumbh Mela 2027 : नगर : आगामी नाशिक येथील कुंभमेळ्याच्या (Nashik Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर देश-विदेशातून (Domestic and International) मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक व पर्यटकांना दर्जेदार आणि व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, तसेच पर्यटन (Tourism) क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘पर्यटन मार्गदर्शक’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी तसेच पर्यटन मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे नाशिक येथील उपसंचालक यांनी केले आहे.

ग्वाल्हेर येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित

​हा प्रशिक्षण कार्यक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयआयटीटीएम), ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन मार्गदर्शनाची मूलतत्त्वे, वारसा व सांस्कृतिक पर्यटन, पर्यटक व्यवस्थापन, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, ग्राहक सेवा, पर्यटनविषयक कायदे व नियम तसेच कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कुंभमेळ्यात पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा (Nashik Kumbh Mela 2027)

​प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण शुल्क, निवास व्यवस्था व भोजनाचा संपूर्ण खर्च पर्यटन विभागामार्फत करण्यात येणार आहे. मात्र, ग्वाल्हेर येथे येण्या-जाण्याचा प्रवास खर्च संबंधित उमेदवारांना स्वतः करावा लागणार आहे. या प्रशिक्षणामुळे पर्यटन क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून आगामी कुंभमेळ्यात पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी सक्षम पर्यटन मार्गदर्शकांची फळी तयार होणार आहे.

​याबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा ८३९०७३१७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.