
Local Crime Branch : नगर : श्रीरामपूर तालुक्यात घरफोडी (Burglary) करणारी दोघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल सहा लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच दोन गुन्हे (Crime) उघडकीस आले आहेत. स्वरुप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे (वय- ३०), द-या परांड्या भोसले (वय-३५, दोघे रा. अंतापुर, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा : इतिहास जगलेला आवलिया भूषण देशमुख
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल
याबाबत माहिती अशी श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथील सोपान थोरात यांच्या राहत्या घरी भर दिवसा घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याची दागिने व रोख रक्कम असाही एकूण चार लाख सहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चोरीचा सहा लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)
या घटनेचा समांतर तपास करत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा स्वरूप काळे यांनी, त्याच्या साथीदारासह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घोडेगाव ते शनिशिंगणापूर रस्त्यावर सापळा रचून दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेला सहा लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या टोळीने आणखी दोन गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासा समोर आले आहे. कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.


