Social Media : सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक पोस्टविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Social Media : सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक पोस्टविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
Social Media : सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक पोस्टविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Social Media : सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक पोस्टविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Social Media : राहाता : श्री साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan) साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभागाबाबत सोशल मीडियावर (Social Media) प्रसारित करण्यात आलेली एक बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन व दिशाभूल करणारी असून या माध्यमातून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नक्की वााचा : जमीन भूसंपादन मोबदल्यासाठी मागीतली एक लाख २० हजारांची लाच

एफडीएने मोठी कारवाई केल्याचा दावा

इन्स्टाग्रामवरील एका अकाऊंटवर श्री साईबाबा संस्थानविरोधात एफडीएने मोठी कारवाई करून लाडू निर्मिती केंद्र व प्रसादालय सील केल्याचा दावा करण्यात आला होता. सदर बातमीमध्ये कोणतेही तथ्य नसून श्री साईबाबा संस्थानचे साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभाग नियमितपणे अन्न सुरक्षा व आरोग्य विषयक सर्व आवश्यक मानकांचे पालन करून कार्यरत आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे संस्थानचे स्पष्टीकरण (Social Media)

संस्थानामार्फत चालविण्यात येणाऱ्या साई प्रसादालयात दररोज हजारो भाविकांना मोफत प्रसाद भोजन दिले जाते. तसेच लाडू व बर्फी निर्मिती विभागात तयार होणाऱ्या लाडू व बुंदी प्रसादाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तपासण्या तेथील प्रयोगशाळेत तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते.
सोशल मीडियावरील संबंधित पोस्टमुळे साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची तसेच संस्थानच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याने हे अकाउंट चालविणाऱ्या संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.


श्री साईबाबा संस्थान सर्व साई भक्तांना आवाहन करते की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित व दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. संस्थानशी संबंधित अधिकृत माहिती केवळ संस्थानच्या अधिकृत माध्यमांद्वारेच ग्राह्य धरावी.