Crime : बँक कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करत एक लाखाची मागणी; ओंकार सातपुतेसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Crime : बँक कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करत एक लाखाची मागणी; ओंकार सातपुतेसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

0
Crime : बँक कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करत एक लाखाची मागणी; ओंकार सातपुतेसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
Crime : बँक कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करत एक लाखाची मागणी; ओंकार सातपुतेसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Crime : नगर : केडगाव परिसरात एका खासगी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाणीची (Assault) धमकी देत एक लाख रूपयांची मागणी केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश साहेबराव पंचमुख (वय ३४, रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते (Omkar Satpute), ओम बारवकर, अभय कारखेले, अनिकेत शिर्के व ओम बारवकर याचे दोन मित्र यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वााचा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुर्वी दुचाकी जबरदस्तीने नेली

फिर्यादी नीलेश पंचमुख हे २६ मे रोजी दुपारी बँक व्यवस्थापकांच्या सांगण्यावरून खानावळीचा डबा आणण्यासाठी झेंडा चौक परिसरात गेले होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांची गाडी घसरून पडली. त्यानंतर संबंधितांनी पंचमुख यांची गचांडी पकडून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मोबाईल, दीड हजार रूपये रोख रक्कम आणि बँकेतील कर्मचाऱ्याची दुचाकी जबरदस्तीने नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नंतर बँक व्यवस्थापक शैलेश सब्बन यांनी संबंधितांशी संपर्क साधल्यानंतर मोबाईल, पैसे आणि दुचाकी परत मिळाल्याने त्यावेळी कोणतीही तक्रार देण्यात आली नव्हती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अपघातात मोबाईल फुटल्याची भरपाई म्हणून एक लाखाची मागणी (Crime)

मात्र, ९ जून रोजी सायंकाळी बँक व्यवस्थापकांनी मागील घटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी रंगोली चौकातील कार्यालयात बोलावल्याचे सांगितले. तेथे गेल्यानंतर ओंकार सातपुते व इतर उपस्थित होते. यावेळी मागील अपघातात मोबाईल फुटल्याची भरपाई म्हणून एक लाख रूपयांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर संबंधितांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच पैसे दिले नाहीत तर काम करू देणार नाही, हातपाय तोडून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.