Encroachment : नगर : सावेडी परिसरात अतिक्रमणाच्या (Encroachment) तक्रारीच्या वादातून एका किराणा दुकानदाराच्या कारवर दगडफेक करून नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) सावेडीतील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. फिर्यादी संतोष नामदेव वाकळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोपान भगवान वाकळे, किशोर भगवान वाकळे, प्रसाद सुरेश वाकळे आणि केतन ठाणगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नक्की वाचा : ‘मंगेश बेकारसे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अन्यथा जिल्हाभर जेलभरो’
आरोपींनी त्रास देणे सुरू केल्याचा आरोप
संतोष वाकळे यांचे सावेडी येथील आरोग्य सदन हॉस्पिटलसमोर किराणा दुकान आहे. त्यांच्या आणि आरोपींमध्ये गेल्या काही वर्षांपासून जमिनीच्या वादातून वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. महानगरपालिकेकडे अतिक्रमणाची तक्रार केल्याच्या रागातून आरोपींनी त्रास देणे सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ता. २१ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता, दुकान बंद करून घरी जात असताना नगर–मनमाड रोडवरील सत्यम कॉम्प्लेक्सजवळ आरोपींनी त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न केला. कार न थांबवल्याने रागातून सोपान वाकळे याने कारच्या काचेवर हाताने मारहाण केली आणि नंतर मागून दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
रस्ता अडवून दगडफेक (Encroachment)
याचवेळी पुढे किशोर वाकळे आणि प्रसाद वाकळे हे मोपेड व इलेक्ट्रिक दुचाकीसह दबा धरून बसले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी कसाबसा तेथून निसटून घरी पोहोचले. २० मे रोजीही अशाच प्रकारे रस्ता अडवून दगडफेक करण्यात आल्याचा आणि घरासमोर येऊन वाहनाची पाहणी करून धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपीनाथ गोरडे करत आहेत.



