Karjat Police Station : धालवडी- कुळधरण शिवारात कुकडी कालव्यात आढळला अज्ञात पुरुष आणि महिलेचा मृतदेह

मृतदेह आढळल्याची माहिती समजताच परिसरात खळबळ

0
Karjat Police Station : धालवडी- कुळधरण शिवारात कुकडी कालव्यात आढळला अज्ञात पुरुष आणि महिलेचा मृतदेह
Karjat Police Station : धालवडी- कुळधरण शिवारात कुकडी कालव्यात आढळला अज्ञात पुरुष आणि महिलेचा मृतदेह

Karjat Police Station : कर्जत : धालवडी (ता.कर्जत) शिवारात कुकडी कालव्याच्या (Kukadi Canal) येसवडी चारीत आवर्तनाच्या पाण्यात एक पुरुष आणि महिलेचा मृतदेह (Dead Body) मिळून आला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. कुकडी कालव्यात दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

नक्की वाचा : बँक कर्मचाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करत एक लाखाची मागणी; ओंकार सातपुतेसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

परिसरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (ता. १०) सकाळी कुकडी कालव्याच्या धालवडी-कुळधरण शिवारात पिण्यासाठी सुटलेल्या आवर्तनाच्या पाण्यात ५५ वर्षाचे अज्ञात पुरुष जातीच्या आणि ६५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह येसवडी चारीत आढळून आला. कुकडी कालव्यात पुरुष आणि महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव (Karjat Police Station)

कर्जत पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत भेट देत दोन्ही मृतदेह ताब्यात घेत कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात धालवडीचे पोलीस पाटील सुनील पंडीत आणि कुळधरणचे शेतकरी गणेश जगताप यांच्या खबरीवरून अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.