Drug sales : कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत, विक्रीस बंदी असलेली 77 प्रतिबंधित इंजेक्शन्स जप्त केली आहेत. पोलिसांनी एकूण 58 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैध औषध विक्री आणि अंमली पदार्थांच्या विरोधात ही कर्जत तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
नक्की वाचा : ‘एफआरपी’ थकीत राहिल्याने केदारेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई
गोपनीय सूत्रांच्या आधारे माहिती
मिळालेल्या माहितीनुसार मिरजगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस अधीकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना, पोलिसांना गोपनीय सूत्रांच्या आधारे माहिती समजली की, पप्पु ऊर्फ प्रविण लाला भोसले, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत याने रोहन भाऊसाहेब लाढाणे, वय 22 वर्षे, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यास MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या नावाचे ड्रग्जचे इंजेक्शन विक्रीसाठी बाभुळगाव खालसा, ता. कर्जत येथील हायवे ब्रिज खाली पाठविलेले आहे.
हेही पहा : धरती चौकात मध्यभागी खड्डा; वाहतुकीला ठरतोय अडसर
दोघांविरुद्ध गुन्हा (Drug sales)
पोलिसांनी तिथे जाऊन रोहन भाऊसाहेब लाढाणे याची झडती घेतली असता त्याचेकडे सदरील इंजेक्शन मिळुन आले त्यानंतर त्यास विक्री करण्यासाठी इंजेक्शन पुरविणारा मुख्य आरोपी पप्पु ऊर्फ प्रविण लाला भोसले याचे घराचे परीसराची पोलीसांनी झडती घेतली असता तिथे आणखी 76 इंजेक्शन मिळाले. एकुण 58640/- रुपये किंमतीचे 77 ड्रग्जचे इंजेक्शन मिळुन आल्याने ते जप्त करुन या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 123, 125, 278 सह औषधीद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 चे कलम 18(c), 27 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन, गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, मिरजगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत.



