Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ जून रोजी पूर्व परीक्षा

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ जून रोजी पूर्व परीक्षा

0
Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ जून रोजी पूर्व परीक्षा
Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ जून रोजी पूर्व परीक्षा

जिल्ह्यातील ५७ परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Maharashtra Public Service Commission : नगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) आयोजित ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ १४ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ५७ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात कोणताही गैरप्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राहावी, यासाठी आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी (Prohibitory order issued) केले आहेत.

जिल्ह्यात एकूण १७ हजार ९४७ उमेदवार

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १७ हजार ९४७ उमेदवार प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेच्या कामकाजासाठी १३ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, २ उपजिल्हाधिकारी दर्जाचे भरारी पथक अधिकारी, ५७ उपकेंद्रप्रमुख (वर्ग-१ अधिकारी), १६१ पर्यवेक्षक, ८११ सहवेक्षक, समन्वय अधिकारी व भरारी पथकांसाठी १५ सहाय्यक, ११४ लिपिक, ५७ केअरटेकर, ५७ बेलमन, ५७ शिपाई, १५० पाणी वाटप कर्मचारी आणि ५७ वाहनचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन (Maharashtra Public Service Commission)

उमेदवारांना परीक्षा केंद्रात सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रवेश दिला जाईल. उमेदवारांनी आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने आणणे तसेच परीक्षा केंद्र परिसरात बाळगणे निषिद्ध आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरूनच डाउनलोड करून घ्यावीत. दुय्यम प्रवेशपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून दिली जाणार नाहीत. तसेच परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व एसटीडी बूथ, फॅक्स सेवा केंद्रे व झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.