
Sangram Bhandare : नगर : महाराष्ट्रात कोठेही हिंदू धर्मीय बांधवांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) धाऊन जाऊन आपल्या हिंदू बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांमध्ये आता त्यांचे नाव घेतलं जातंय. हिंदुंवर अन्याय करणारे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद्यांच्या विरोधातही आमदार जगताप सक्षम भूमिका घेत नागरिकांमध्ये जनजागृती (Public Awareness) करत आहेत. त्यामुळे हिंदू समाज आता जागृत होत असून गर्व से कहो हम हिंदू है| असे छातीठीकपणे म्हणत आहेत. अशा धर्मासाठी काम करणाऱ्या आदर्शवत हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांच्या या कार्याची प्रेरणा इतर आमदारांनी घेऊन आपापल्या भागातही हिंदुत्वासाठी, धर्मासाठी काम करावे, असे आवाहन संग्राम भंडारे (Sangram Bhandare) यांनी केले.
नक्की वाचा : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विशेष मोहिम राबवा; भाजप जिल्हाध्यक्षांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुणे आयुर्वेद महाविद्यलयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी संग्राम भंडारे यांनी आमदार जगताप यांना महावस्त्र, शिवकालीन पगडी, तुळशीचा हार घालून व गोवत्साची मूर्ती देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी श्रीराम संघटनेचे अध्यक्ष सागर बेग, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक मयूर बांगरे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप (Sangram Bhandare)
यावेळी अहिल्यानगर वारकरी, दिंडी समाज संघटनेच्या शेकडो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करत आमदार संग्राम जगताप यांना आशीर्वाद दिले. माजी नगरसेवक शिवाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देविदास बारस्कर महाराज यांनी जगताप यांचा शाल, हार घालून तसेच तुकाराम महाराजांची पगडी व वीणा देऊन अनोखा सत्कार केला. अनेकांनी सामाजिक जाणीवेतून सत्काराच्या खर्चास फाटा देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले.


