
Superintendent of Police : नगर : अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar city) व जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे तसेच चोऱ्यांच्या घटनांमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने (District Police Administration) विशेष मोहिम राबविण्याची गरज आहे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्षांनी जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) मुम्मका सुदर्शन यांच्याकडे केली.
नक्की वाचा : सोबलेवाडीच्या कन्येची जागतिक भरारी; आर्या सोबलेची अबुधाबीच्या विद्यापीठात ४ कोटींच्या स्कॉलरशिपसह निवड
सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी
भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेतली. यावेळी चर्चा करताना भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पूर्ण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखून संवेदनशील भागांवर लक्ष देत नागरिकांशी समन्वय वाढवून सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मुम्मका सुदर्शन यांचा या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद (Superintendent of Police)
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या चर्चेस सकारात्मक प्रतिसाद देत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत कार्यरत असल्याचे सांगितले. यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष अनिल गदादे, प्रसाद ढोकरीकर, गणेश भालसिंग उपस्थित होते.


