
नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मूळ निवासी असलेली व सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये स्थायिक असलेल्या आदिती शिदोरे (Aditi Shidore) या अष्टपैलू क्रिकेट खेळाडूने (Cricket player) चमकदार कामगिरी करत अहिल्यानगर जिल्ह्याच्या नाव लौकिकात भर घातली आहे. तिने चमकदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियातील राज्याच्या १९ वर्षांखालील संघात निवड (Selected for the Australian state Under-19 team) झाली.
नक्की वाचा : गरिबीची झळ! वीज पडून बैल दगावला, बळीराजाने पत्नीलाच जुंपलं औताला
आदिती नेमकी कोण? (Aditi Shidore)
पाथर्डीचे रुपचंद शिदोरे यांची दोन्ही मुले अविनाश व विकास नोकरीनिमित्त ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. पाथर्डी येथे जन्मलेली अविनाश यांची कन्या आदिती ही आई वडिलांसोबत ऑस्ट्रेलियात राहते. अविनाश शिदोरे हे तेथील ‘रियल फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत सुपरवायझर आहेत. त्यांची मुलगी आदितीने शिक्षणाबरोबरच वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले. तिच्यातील कौशल्य पाहून वडिलांनी तिला क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आदितीने क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. अनेक पुरस्कार तिने मिळविले. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तिची १९ वर्षांखालील स्टेट क्रिकेट खेळाडू म्हणून निवड झाली आहे. शाळेतील क्रिकेट टीमचे ती प्रतिनिधित्व करीत आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची कुणाला?
‘प्लेअर ऑफ द विक’ होण्याचा मान (Aditi Shidore)
क्रिकेट बरोबरच आदितीने जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. गल्लीतील क्रिकेटपासून सुरुवात करणारी आदिती आता स्टार क्रिकेटपटू झाली आहे. तिचे वडील स्वतः चार-चार तास तिच्याबरोबर मैदानावर सराव करतात. घरातून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे आदितीने मोठी मजल मारली. तिने चार षटकांत नऊ धावा देत दोन फलंदाज बाद करत गोलंदाजीचे कसबही दाखवले आहे. तर तिने एका सामन्यात चक्क १२३ चेंडूत नाबाद २०७ धावा जमवत प्लेअर ऑफ द विक होण्याचा मानही मिळविला आहे.


