Scholarship : सोबलेवाडीच्या कन्येची जागतिक भरारी; आर्या सोबलेची अबुधाबीच्या विद्यापीठात ४ कोटींच्या स्कॉलरशिपसह निवड

सोबलेवाडी आणि परिसरात आनंदाचे वातावरण

0
Scholarship : सोबलेवाडीच्या कन्येची जागतिक भरारी; आर्या सोबलेची अबुधाबीच्या विद्यापीठात ४ कोटींच्या स्कॉलरशिपसह निवड
Scholarship : सोबलेवाडीच्या कन्येची जागतिक भरारी; आर्या सोबलेची अबुधाबीच्या विद्यापीठात ४ कोटींच्या स्कॉलरशिपसह निवड

Scholarship : पारनेर: सोबलेवाडी (ता. पारनेर) येथील आर्या अभिजीत सोबले (Arya Soble) हिची संयुक्त अरब अमिरातीमधील नामांकित अशा ‘मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ एआय’, अबुधाबी (Abu Dhabi) येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, तिला तब्बल ४ कोटी रुपयांची घवघवीत स्कॉलरशिप (Scholarship) (शिष्यवृत्ती) जाहीर झाली असून, तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे सोबलेवाडीसह संपूर्ण महाराष्ट्राचा मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे.

नक्की वाचा : कोकणातील नाचणी आता राहुरीत, कापूस-कांद्याला दिला पर्याय; कृषी विद्यापीठाचा प्रयोग यशस्वी

ही एक कौतुकास्पद घटना

आर्याचे हे यश तिच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे फळ आहे. ग्रामीण भागातून येऊन जागतिक स्तरावरील विद्यापीठात स्थान मिळवणे, ही एक मोठी आणि कौतुकास्पद घटना आहे. तिच्या या यशाच्या प्रवासात तिचे आई-वडील, ऋतुजा आणि अभिजीत सोबले यांनी घेतलेली अविरत मेहनत आणि त्यांना लाभलेले मार्गदर्शक श्रेया आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन अत्यंत निर्णायक ठरले आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच आर्याने हे शिखर गाठले आहे.आर्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेरचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, प्राध्यापक नवीन कुमार आहेर, मोहनराव रेपाळे आणि बाळासाहेब सोबले यांनी विशेष कौतुक करत तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सोबलेवाडी आणि परिसरात आनंदाचे वातावरण (Scholarship)

याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर व प्रा. नवीन कुमार आहेर म्हणाले की, “आर्याने मिळवलेली ४ कोटींची स्कॉलरशिप ही केवळ एका व्यक्तीचे यश नसून, ती ग्रामीण भागातील आणि महाराष्ट्रातील असंख्य मुला-मुलींसाठी एक दीपस्तंभ आहे. तिची ही जागतिक भरारी भावी पिढीला आपली ध्येये उंच ठेवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड प्रेरणा देणारी ठरेल.”आर्याच्या या अभूतपूर्व यशामुळे सोबलेवाडी आणि परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी कारकिर्दीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आर्याचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच अभिमानास्पद ठरले आहे.