Long March : एससी/एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरुद्ध बीड ते मंत्रालय ‘लाँग मार्च’; सुपा येथे होणार सत्यशोधक प्रबोधन संमेलन

उपवर्गीकरणाचा अधिकार न्यायालयाला नाही

0
Long March : एससी/एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरुद्ध बीड ते मंत्रालय 'लाँग मार्च'; सुपा येथे होणार सत्यशोधक प्रबोधन संमेलन
Long March : एससी/एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरुद्ध बीड ते मंत्रालय 'लाँग मार्च'; सुपा येथे होणार सत्यशोधक प्रबोधन संमेलन

Long March : पारनेर : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्देशांच्या विरोधात संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी ‘अनुसूचित जाती/जमाती एकता समिती’च्या वतीने बीड ते मंत्रालय (Beed to Mantralaya) असा पायी ‘लाँग मार्च’ (Long March) आयोजित करण्यात आला आहे. १० ते २६ जून  या कालावधीत हा मार्च सुरू असून, यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, मंगळवार (ता. १६)  सायंकाळी ५:३० वाजता सुपा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे एका विशेष ‘सत्यशोधक प्रबोधन संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. सुपा येथील श्रीराम आनंद मंगल कार्यालय, वाळवणे रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

नक्की वाचा : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील

उपवर्गीकरणाचा अधिकार न्यायालयाला नाही

याबाबत अधिक माहिती देताना आयोजकांनी स्पष्ट केले की, “आरक्षण हा संविधानाने दिलेला आमचा मूलभूत अधिकार आहे. यात फेरबदल करण्याचा किंवा उपवर्गीकरणाचा अधिकार न्यायालयाला नाही. हा निर्णय पूर्णपणे संविधानविरोधी आणि घटनाबाह्य आहे. उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजातील विविध जातींमध्ये फूट पाडून आरक्षण संपवण्याचे हे मनुवादी सरकारचे मोठे षडयंत्र आहे.”हे षडयंत्र जनतेसमोर उघड करणे, समाजात प्रबोधन घडवून आणणे आणि आरक्षणाचे रक्षण करणे हाच या लाँग मार्च आणि प्रबोधन संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे समितीने म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन (Long March)

संवैधानिक हक्कांच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सर्व समाजबांधवांनी तन, मन आणि धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रबोधन संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरक्षणावरील आघाताचा निषेध नोंदवावा, अशी विनंती अनुसूचित जाती/जमाती एकता समिती, तालुका पारनेर यांच्यावतीने करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी राजेंद्र करंदीकर (संपर्क:९९२१५९५९११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा लाँग मार्च केवळ एक मोर्चा नसून, आरक्षणाप्रती असलेली समाजाची एकजूट असल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीत स्पष्ट होत आहे.