Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील

65 वर्षानंतर पेन्शन वाढ मिळण्याची मागणी

0
Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : नगर : अनेक पिढ्या घडविण्याचे काम गुरुजनांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाने विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी (Students) नावलौकिक मिळवला. त्यांच्यामुळे समाजव्यवस्था टिकून आहे. आज व्यवस्था बदललेली, काळ बदलले मात्र आजही जुन्या काळातील गुरुजींचा (Teacher) दरारा तेवढाच आहे. गुरुजी या नावाने समाजात वेगळे स्थान मिळवले आहे. चिरंतर काम करुन त्यांनी अनेक पिढ्या समृद्ध केले. मी बोलतो ते देखील गुरुजींची देणगी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

नक्की वाचा : केंद्र सरकारची बारा वर्षे ठरली लोककल्याणाची सुवर्ण वर्षे : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील

जिल्हाभरातील हजारो पेन्शनर या कार्यक्रमाला उपस्थित

सेवानिवृत्त कर्मचारी व पेन्शनरांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या वतीने शहरात नंदनवन लॉन येथे ‘संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री  ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. हा मेळावा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी  आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, उपमहापौर धनंजय जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, विभागीय अध्यक्ष वसंतराव सबनीस, धुळे अध्यक्ष अनंतराव पाटील, जळगाव अध्यक्ष सदाभाऊ सोनवणे, नंदुरबार अध्यक्ष मधुकर साबळे, नाशिक अध्यक्ष बाळासाहेब खैरनार, अहिल्यानगरचे अध्यक्ष द.मा. ठुबे गुरुजी, कार्याध्यक्ष रावसाहेब पवार, सरचिटणीस बन्सी उबाळे आदींसह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हाभरातील हजारो पेन्शनर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील

पालकमंत्री विखे म्हणाले की (Radhakrishna Vikhe Patil)

पुढे बोलताना पालकमंत्री विखे म्हणाले की, सोमवारी किंवा मंगळवारी पेन्शनर्सची बैठक घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्‍न सोडविण्याचे सूचना त्यांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीसारखी शिक्षण व्यवस्था नाही, पूर्वी ज्ञानमंदिरे होती. सध्या समाजात वाढत चाललेला जातीयवाद चिंताजनक असल्याचे त्यांनी भाष्य केले. तरुण पिढीला घडविण्याचे पुण्याचे काम गुरुजनांनी केले. पुन्हा सुसंस्कृत व आत्मनिर्भर पिढी घडविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.प्रा. राम शिंदे म्हणाले की, शेवटच्या घटकाची जबाबदारी घेऊन शिक्षक कार्य करतो. ज्यांना घडवले ते आमदार झाले, त्यांनी प्रश्‍न मांडले तर प्रश्‍न सुटतील. विधान परिषदेत पेन्शनरांचा प्रश्‍न सुटेपर्यंत प्रश्‍न लावून धरण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील

फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन

गुरुजींनी अनेक पिढ्या घडवून राज्य प्रगतीवर नेला. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत नेल्या. माणसं घडविण्याचे काम त्यांनी केले. तुमच्या प्रश्‍नाकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. पेन्शन ही मेहरबानी नसून, तुमच्या घामाचा व हक्काचा पैसा आहे. हा प्रश्‍न सोडविणे ही आमची नैतिक जबाबदारी असून, संपूर्ण राज्यातील हा प्रश्‍न निकालात काढू. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 65 वर्षानंतर पेन्शन वाढ मिळाली पाहिजे, ही रास्त मागणी पुढे घेऊन जाऊ. शिक्षकांबरोबर इतरांचा फायदा होणार आहे. शिक्षक हा समाज परिवर्तन करतो, पेन्शनचा प्रश्‍नांचे श्रेय देखील शिक्षकांना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : गुरुजनांनी अनेक पिढ्या समृद्ध केल्या : राधाकृष्ण विखे पाटील

विधानमंडळ भावनात सन्मानाने सहलीचे निमंत्रण

प्राप्त परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पेन्शन दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारीवर प्रशासकीय कारवाई करण्याचे सूचना त्यांनी दिल्या.या  प्रश्‍नाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आई-वडिलांप्रमाणे सर्वांना शिक्षक प्रिय असतो. त्यांनी घडविलेला विद्यार्थी मोठा झालेला असतो. हा प्रश्‍न सोडविण्याचे त्यांनी वचन दिले. तसेच विधानमंडळ भावनात सन्मानाने सहलीचे निमंत्रण देखील त्यांनी दिले.प्रास्ताविकात बन्सी उबाळे म्हणाले की, मेळावा ठेवण्याचा उद्देश शासनस्तरावर प्रश्‍न मांडले जावे. लोकप्रतिनिधींना या प्रश्‍नाची जाणीव व्हावी व त्यांनी लक्ष द्यावे. सुसंवादातून प्रश्‍न सुटावे, त्याला गती मिळावी. 

65 वर्षानंतर पेन्शन वाढ मिळण्याची मागणी

प्रत्येक तालुक्यात आमदार निमंत्रण देण्यात आले होते. कारण त्यांनी विधानसभेत प्रश्‍न मांडावे. सेवरानिवृत्त यांच्या प्रश्‍नावर सभागृहात चर्चा व्हावी. नगरपालिका व जिल्हा परिषद यांचे पगार उशिरा होतात. त्यामुळे पेन्शन देखील उशिरा मिळते. पेन्शन ट्रेजरी मार्फत मिळावी 80 वय झाल्यानंतर 20% पेन्शन वाढ होते, त्याऐवजी 5 ते 10 टक्के वाढ 65 वर्षानंतर पेन्शन वाढ मिळण्याची मागणी करुन त्यांनी विविध मांडले.संघटनेचे अध्यक्ष द.मा. ठुबे गुरुजी म्हणाले की, जिल्हा परिषदेत पदाधिकारी नाही. त्यामुळे निवडश्रेणीचा प्रश्‍न सुटला नाही. लोक अदालत घेतली जाते, मात्र ज्येष्ठांचे प्रश्‍न प्रलंबित ठेवणे योग्य नाही. जिल्हा परिषदेत आढावा बैठक घ्या व पेन्शनरचे प्रश्‍न मार्गी लावण्याची त्यांनी सूचना केला. विधानसभेतून प्रश्‍न सोडवावा व राज्य पातळीवर हा प्रश्‍न सुटण्यासाठी हा मेळावा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कविता केल्या सादर

रावसाहेब पवार गुरुजी यांनी अध्यक्षीय सूचना मांडली. उपाध्यक्ष कोल्हे यांनी स्वागत केले. लोणी येथील गुरुजींनी काय सांगू साहेब आम्हाला न्याय भेटेना…  व आमच्या मागण्या मंजूर करा… या कविता सादर केल्या. कवी संजय गीते लिखित रानफुल काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कळसकर गुरुजी यांनी देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्धव काळापहाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी अशोक धसाळ, सुर्यभान काळे, बबन कुलट, शशिकांत इथापे, विनायक कोल्हे, गजानन ढवळे, महादेव गांगर्डे, ज्ञानेदेव थोरात, बापूसाहेब करपे, प्रतापराव आंब्रे, दत्तात्रय गावडे, विठ्ठलराव वाडगे, सु.फ.वांढेकर आदीसह सर्व तालुका अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.