Electricity Theft : वीज चोरी करणाऱ्या सात जणांविरूध्द गुन्हे; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Electricity Theft : वीज चोरी करणाऱ्या सात जणांविरूध्द गुन्हे; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Electricity Theft : वीज चोरी करणाऱ्या सात जणांविरूध्द गुन्हे; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Electricity Theft : वीज चोरी करणाऱ्या सात जणांविरूध्द गुन्हे; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Electricity Theft : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील शेंडी गावाच्य शिवारात महावितरण कंपनीकडून (Mahavitaran) वीज चोरांविरूध्द मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सात वेगवेगळ्या ठिकाण सुरू असलेली वीज चोरी (Electricity Theft) उघडकीस आणली असून, या प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्य वीज वाहिनीवरून अनधिकृतपणे वीज चोरी

महावितरणच्या शेंडी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सुहार सखाराम शिंदे (वय ३५, रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांन या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्य आहेत. महावितरणच्या पथकाने १३ जून दरम्यान शेंडी गावात केलेल्या तपासणीत संशयितांनी मुख्य वीज वाहिनीवरून अनधिकृतपणे वीज चोरी केल्याचे समोर आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महावितरण कंपनीचे हजारो युनिटचे नुकसान (Electricity Theft)

यामध्ये पंढरीनाथ उत्तम कराळे, साहेबराव मधाजी दाणी, तुकाराम शंकर भगत, किरण राजेंद्र दाणी, नामदेव गजानन दाणी, भीमराज बाळासाहेब शिंदे आणि पोपट बाळासाहेब दाणी यांनी मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केल्याच निष्पन्न झाले आहे. या सर्व संशयितांनी गेल्या काही महिन्यांत घरगुत आणि इतर वापरासाठी महावितरण कंपनीचे हजारो युनिटचे नुकसान केले होते. त्यांना महावितरणकडून वीज चोरीचे देयक भरण्याच आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी ते भरले नाही. म्हणून कनिष्ठ अभियंता शिंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी विद्युत कायद्यानुसार सातही संशयितांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.