
Tofkhana Police Station : नगर : अहिल्यानगर शहरातील उपनगरात सुरू असलेल्या बांधकामावरील इलेक्ट्रिक वायर चोरी (Theft of electric wires from a construction site) करणारे दोघे संशयित आरोपी तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेला दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. करण मनोज पवार (वय ३१, रा. संजयनगर, मारुती मंदिर, कोपरगाव, ता. जि. अहिल्यानगर), ऋत्विक सुनिल पवार (वय २०, रा. सोनई, ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची (Suspected Accused) नावे आहेत.
नक्की वाचा : सरकारने शेतकऱ्यांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या : राधाकृष्ण विखे पाटील
अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
तोफखाना पोलीस ठाण्यात 30 मे रोजी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करत असता तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार करण पवार यांनी त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार दोघांनाही पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. यांच्याकडून दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांच्या पथकाने केली कारवाई (Tofkhana Police Station)
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार, सुधीर खाडे, सुरज वाबळे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, भागवत बांगर, सतिष शिंदे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.


