पालकांचा शोध निष्फळ; बालकल्याण समितीकडे सुपूर्द
Little girl found abandoned : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे सुमारे चार ते पाच वर्षांची एक चिमुकली बेवारस अवस्थेत आढळून आल्याने (Little girl found abandoned) परिसरात खळबळ उडाली. सोमवारी (दि. १५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खरवंडी ते भालगाव रस्त्यावरील मालेवाडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला ही मुलगी एकटीच असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
मुलीची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
ग्रामस्थांनी तत्काळ याबाबत पाथर्डी पोलिसांना (Pathardi Police) माहिती दिली. माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास बटुळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शितल गुंजाळ तसेच होमगार्ड पिराजी गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिची ओळख किंवा पालकांबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. यानंतर पोलिसांनी मालेवाडी तसेच खरवंडी परिसरात मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांकडे चौकशी करून माहिती घेतली; मात्र मुलीचे पालक अथवा नातेवाईक कोणीही आढळून आले नाहीत. त्यामुळे मुलीची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पालकांचा शोधण्याचे प्रयत्न सुरू (Little girl found abandoned)
दरम्यान, पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित चिमुकलीला अहिल्यानगर येथील बालकल्याण समितीकडे सुरक्षितरित्या सुपूर्द केले आहे. ही मुलगी नेमकी कोणाची आहे, ती त्या ठिकाणी कशी पोहोचली आणि तिचे पालक कुठे आहेत, याबाबत पाथर्डी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चिमुकली सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात आली असून तिच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या मुलीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



