Sarpanch Post Cancelled : अकोले : अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील (Tribal Area) सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या राजूर ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा निगळे यांचे सरपंच पद (Sarpanch Post Cancelled) भ्रष्टाचाराच्या कारणावरून नाशिक विभागीय आयुक्तांनी (Nashik Divisional Commissioner) रद्द केले आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर येथील कवडे मळा परिसरात युवकाचा खून
विभागीय आयुक्तांकडे केली हाेती तक्रार
निगळे यांचा सरपंच पदाचा कारभार तसा वादग्रस्त ठरत आला आहे. वेळोवेळी त्यांच्यावर अनेक आरोप झाले आणि आता भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निगळे यांना सरपंचपद गमवावे लागल्याने आमदार डॉ. किरण लहामटे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक यांनी माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायत गैरकारभाराबाबत बरीच माहिती जमा केली होती. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्तांसह इतर ग्रामपंचायतीशी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. चौकशी व्हावी यासाठी त्यांनी आत्मदहन आंदोलन केले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राहाता पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमून तक्रारीची चौकशी केली. या चौकशीमधील निष्कर्षाच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे सरपंच निगळे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचा अहवाल पाठवला होता.
१ कोटी १४ लाखांचा अपहार..
याप्रकरणी १ कोटी २ लाख ३९ हजार १३६ रुपयांचा संशयित अपहार आणि १२ लाख ५० हजार ४१५ रुपये कायमस्वरूपी अपहार अशी एकूण रक्कम १ कोटी १४ लाख ८९ हजार ५५१ इतकी होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कर्तव्ये पार पाडताना गैरवर्तणूकीचा ठपका (Sarpanch Post Cancelled)
ग्रामनिधी, १५वा वित्त आयोग निधी, पाणीपुरवठा योजना व ५ टक्के पेसा योजना या मधून विकासकामांवर खर्च करतानाचा संशयित अपहार हे या प्रकरणातील दोषारोप होते. विभागीय आयुक्तांसमोर अंतिम सुनावणी झाली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रस्तावानुसार सरपंच निगळे जबाबदार असून, त्यांनी कर्तव्ये पार पाडताना गैरवर्तणूक केल्याचे आणि सरपंचाची कर्तव्ये पार पाडण्यात दुराग्रहाने हेळसांड केल्याचा ठपका ठेवत त्यांना पदावरून काढून टाकणे योग्य राहील, असे विभागीय आयुक्तांनी आपले निकालपत्रात नमूद केले आहे. त्यांना सरपंच तसेच सदस्य पदावरून काढून टाकण्याचा निर्णय दिला. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.



