Crime : नगर : श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पिसोरेखांड येथील वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे.
हेही वाचा : जप्त गुटखा पुन्हा बाजारात; श्रीगोंदा पोलिसांची चौकशी करण्याची मागणी
१२ तासांच्या आत अटक
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९५/२०२६ भारतीय न्यायसंहिता कलम १०३ अन्वये दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी विलास दादा गावडे (रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा) यास अवघ्या १२ तासांच्या आत अटक करण्यात आली होती. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.
नक्की पहा : अहिल्यानगरमध्ये तरुणावर कुऱ्हाडीने वार करत हत्या
कुऱ्हाड जप्त (Crime)
पोलीस कोठडीदरम्यान आरोपीची सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने खून प्रकरणात वापरलेले हत्यार लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मेमोरँडम पंचनाम्याद्वारे संबंधित हत्यार जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ, राहुल मोढळे आणि शरद चौभे यांनी केली.



