Search Operation : ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत अल्पवयीन मुलीचा शोध; परभणीतून सुखरूप पालकांकडे हस्तांतरण

0
Search Operation : 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत अल्पवयीन मुलीचा शोध; परभणीतून सुखरूप पालकांकडे हस्तांतरण
Search Operation : 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत अल्पवयीन मुलीचा शोध; परभणीतून सुखरूप पालकांकडे हस्तांतरण

Search Operation : नगर : ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत बेलवंडी पोलिसांनी तत्पर कारवाई करत घरातून निघून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील एक अल्पवयीन मुलगी ४ जून २०२६ रोजी सकाळी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. ती परत न आल्याने तिच्या पालकांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा : जप्त गुटखा पुन्हा बाजारात; श्रीगोंदा पोलिसांची चौकशी करण्याची मागणी

शोधमोहीम

या तक्रारीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात ६ जून २०२६ रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत बेलवंडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहीमेदरम्यान रविवारी (ता. १४) संबंधित अल्पवयीन मुलीचा परभणी येथे शोध लागला.

नक्की पहा : अहिल्यानगरमध्ये तरुणावर कुऱ्हाडीने वार करत हत्या

सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन (Search Operation)

पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिच्या पालकांच्या स्वाधीन सुखरूपपणे सुपूर्द केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे, पोलीस हवालदार रवींद्र औटी, महिला पोलीस हवालदार अविंदा जाधव, पोलीस नाईक यश ठोंबरे आणि पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे यांनी शोधमोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.