Kunal Khemu : कुणाल खेमूसोबत 26 जूनपासून सुरू होणार ‘अलायन्स’, प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिॲलिटी शो

Kunal Khemu : कुणाल खेमूसोबत 26 जूनपासून सुरू होणार ‘अलायन्स’, प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिॲलिटी शो

0
Kunal Khemu : कुणाल खेमूसोबत 26 जूनपासून सुरू होणार ‘अलायन्स’, प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिॲलिटी शो
Kunal Khemu : कुणाल खेमूसोबत 26 जूनपासून सुरू होणार ‘अलायन्स’, प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिॲलिटी शो

Kunal Khemu : अलायन्स (Alliance) हा एकूण 42 भागांचा शो असून तो सहा आठवडे चालणार आहे. 26 जूनपासून त्याचा शुभारंभ होणार असून भारतासह जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये तो स्ट्रीम केला जाणार आहे.

बानिजय एशिया निर्मित आणि कुणाल खेमू (Kunal Khemu) होस्ट करत असलेल्या या रोमांचक रिॲलिटी शोमध्ये (Reality show) 16 स्पर्धक सहयोगी म्हणून खेळात प्रवेश करतील. मात्र बदलती समीकरणे, विश्वासघात आणि रणनीतीपूर्ण खेळ प्रत्येक युतीची कसोटी पाहणार आहेत, जिथे सर्वांचे लक्ष्य अंतिम विजयावर असेल.

हा शो थरार, अनिश्चिततेच्या ट्विस्टने भरलेला असेल

प्राइम व्हिडिओसाठी हा एक विशेष उपक्रम आहे, कारण अलायन्सचा नवा भाग दररोज दुपारी 12 वाजता प्रदर्शित होणार आहे. हा शो थरार, अनिश्चितता आणि अनपेक्षित ट्विस्टने भरलेला असेल, जसा यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नाही.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कुणाल रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार (Kunal Khemu)

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या बहुप्रतीक्षित रिॲलिटी सीरिज अलायन्सच्या जागतिक प्रीमियरची तारीख 26 जून जाहीर केली आहे. अलायन्स ही प्राइम व्हिडिओची जगभरातील पहिली डेली सीरिज ठरणार आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना दररोज नवा भाग पाहायला मिळेल. या शोमधून कुणाल खेमू पहिल्यांदाच रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.

अलायन्स हे टाल्पा स्टुडिओजच्या जागतिक स्तरावर लोकप्रिय डच फॉरमॅटचे पहिले आंतरराष्ट्रीय रूपांतर आहे, ज्याची निर्मिती जॉन डी मोल यांनी केली आहे. त्याच्या भारतीय आवृत्तीची निर्मिती बानिजय एशियाने केली आहे. हिंदी भाषेतील ही अनस्क्रिप्टेड सीरिज 26 जूनपासून भारतासह जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होईल. अलायन्स हा प्राइम व्हिडिओच्या प्राइम डे स्पेशल लाइनअपचाही भाग आहे. यंदा जुलैमध्ये अमेझॉन प्राइम डेचा दहावा सीझन भारतात परतत असून प्राइम सदस्यांना आकर्षक ऑफर्स, मोठी बचत, नवीन लॉन्च, ब्लॉकबस्टर मनोरंजन आणि इतर अनेक विशेष लाभ मिळणार आहेत.

आपल्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग, हजरजबाबीपणा आणि कॉमेडी, थ्रिलर तसेच गंभीर भूमिकांमध्ये सहज वावरण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाणारे कुणाल खेमू अलायन्स मधून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ते पहिल्यांदाच एखाद्या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतील. भारतीय प्रेक्षकांच्या आवडीनुसार तयार करण्यात आलेल्या या गेम-फॉरमॅट शोमध्ये 16 स्पर्धक सहभागी होतील, जे जोड्यांमध्ये खेळात प्रवेश करतील. मात्र लवकरच त्यांना समजेल की या खेळात कोणतीही युती कायमची नसते. येथे प्रत्येक युती कधी फायद्याची तर कधी सर्वात मोठा अडथळा ठरू शकते. अखेरीस सर्व आव्हाने पार करून फक्त एकच स्पर्धक अंतिम विजेता ठरेल.

प्राइम व्हिडिओ इंडियाचे ओरिजिनल्स प्रमुख आणि संचालक निखिल माधोक म्हणाले, “ अलायन्स देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भारतासाठी या प्रकारचा हा पहिलाच फॉरमॅट असून यात रणनीती, बदलती समीकरणे आणि सतत बदलणारा गेमप्ले पाहायला मिळेल, जो प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत दररोज खिळवून ठेवेल.”

ते पुढे म्हणाले , “या जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या फॉरमॅटला भारतात आणण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा बानिजय एशियासोबत भागीदारी करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. द ट्रेटर्स इंडिया आणि टू मच विथ काजोल अँड ट्विंकल यांसारख्या आमच्या अनस्क्रिप्टेड शोना मिळालेल्या यशावरून प्रेक्षकांमध्ये वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण रिॲलिटी कंटेंटची मागणी वाढत असल्याचे स्पष्ट होते. अलायन्स ही परंपरा पुढे नेईल आणि या प्रकारात स्वतःची भक्कम ओळख निर्माण करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

बानिजय एशियाचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ दीपक धर म्हणाले,“ अलायन्स या नावाला साजेसंच, या शोसाठी प्राइम व्हिडिओसोबतची आमची भागीदारी आम्हाला खूप उत्साहित करते. या फॉरमॅटची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याचा भव्य स्केल. यातले गेम्स अत्यंत सिनेमॅटिक, भव्य आणि आमच्या आतापर्यंतच्या कोणत्याही प्रकल्पापेक्षा वेगळे आहेत.”

ते पुढे म्हणाले , “मात्र केवळ भव्यता एखादा फॉरमॅट यशस्वी बनवत नाही. अलायन्सला खास बनवते ते म्हणजे रणनीती आणि परफॉर्मन्स यांच्यातील सततचा समतोल. स्पर्धकांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर सातत्याने आव्हानांचा सामना करावा लागतो, जिथे प्रत्येक टास्क नव्या संधी आणि नव्या अडचणी घेऊन येतो. हा शो वेगवान, अनपेक्षित आणि अत्यंत रोमांचक आहे. 26 जूनपासून प्रेक्षक याचा अनुभव घेतील, याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

अलायन्स हा केवळ एक नवा शो नाही, तर तो आता तुमच्या दैनंदिन मनोरंजनाचा भाग बनणार आहे. दररोज नवा भाग, नव्या युती, नवे ट्विस्ट आणि भरपूर ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 26 जूनपासून दररोज दुपारी 12 वाजता प्राइम व्हिडिओवर त्याचा नवा भाग स्ट्रीम होईल.